लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. त्यांच्या खात्यात लवकरच १,५०० चा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सप्टेंबरनंतर या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होऊ शकते.

या तारखेनंतर सप्टेंबरनंतर टप्प्याटप्प्याने पैसे येणार?

विश्वासू सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये टप्प्याटप्प्याने जमा केले जाऊ शकतात. २४ सप्टेंबरनंतर खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. गणपती विसर्जनाच्या काळात निधी वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक मदत मिळू शकते. मात्र, ही सध्या संभाव्य तारीख असून अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे.

तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे विलंब

ऑगस्ट महिन्याचा हप्ता याआधीच मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे निधी वितरणाला उशीर झाल्याचे सांगितलं जात आहे. आता निधी वितरणाची प्रोसेस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येत आहे. रक्कम पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे.

१ कोटी ६६ लाख महिलांना मिळणार लाभ

ई-केवायसी प्रोसेसनंतर लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुमारे १ कोटी ६६ लाख असल्याची माहिती समोर आली आहे. या पात्र महिलांना योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्यात येते आणि ती DBT द्वारे बँक खात्यात जमा केली जाते.

जुलैचा हप्ता यापूर्वी जमा

ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. आता ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे. २४ सप्टेंबरनंतर पैसे होण्याची माहिती समोर आली असली, तरी अधिकृत घोषणा झाल्यानंतरच निश्चित तारीख स्पष्ट होणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    मुखदर्शन असो वा चरणस्पर्श, ‘नवसाला पावणारा’ म्हणून ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक लालबाग-परळच्या गल्लीबोळात दाखल होत असतात. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक तासनतास, अगदी दिवस-दिवस…

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सध्या एकाच नावाचा आणि एकाच दौऱ्याचा दबदबा पाहायला मिळत आहे आणि तो म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड लोकसभा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांचा.…

    Leave a Reply

    You Missed

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा