मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले असून, महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांचा अल्टीमेटम दिला आह. जरांगे पाटील यांनी ५८ लाख मराठा नोंदी कायम ठेवल्या जातील आणि हैदराबाद गॅझेटमध्ये सुधारणा केली जाईल याची हमी मिळवण्यावर भर दिला आहे.

समाजाच्या हितासाठी माघार घेतल्याचं जरांगेंनी म्हटलं

या संदर्भात बोलताना जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, ५८ लाख नोंदींमधून एकही नोंद कमी होणार नाही, याची खात्री देणे महत्त्वाचे होते. तसेच, हैदराबाद गॅझेटचा सुधारित जीआर काढण्यास सरकार तयार झाले आहे, हे मोठे यश असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजाच्या हितासाठी काही वेळा माघार घेणे आवश्यक असते, असे सांगत त्यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सामान्य माणूस म्हणून लढत राहू, असंही ते म्हणाले.

सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली जरांगेंची भेट

सरकारच्या शिष्टमंडळाने बीडमधील पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांची मनधरणी केली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार सुरेश धस, आमदार प्रसाद लाड आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. यानंतर सकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेऊन उपोषण सोडल्याची घोषणा करण्यात आली. मुंबईत गेलेल्या आंदोलकांनी परत यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

सरकारला तीन महिन्यांचा वेळ

सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला. या काळात मागण्या पूर्ण न केल्यास आम्ही मुंबई गाठणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. उपोषण आज स्थगित करत असलो तरी आंदोलन सुरूच राहणार, असेही मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

२० दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती खालावली 

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपले २० दिवसांचे उपोषण सोडल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांनी उपचाराची आवश्यकता सांगितल्यानंतर जरांगे पाटील आता बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. जिथे त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार केले जातील.

हात-पाय हलवणे देखील कठीण झाले होते

मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघालेले असताना पाटोदा येथे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे पाटोदा येथे विठ्ठल मंदिराच्या भक्तनिवासमध्ये त्यांना सलाईन लावण्यात आले. अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर, १२ सप्टेंबरपासून त्यांनी सलाईन घेणे बंद केले होते. त्यांना हात-पाय हलवणे देखील कठीण झाले होते. त्यामुळे त्यांनी उपचार घ्यावेत, अशी मागणी मराठा समाजातील आंदोलक करत होते.

या प्रदीर्घ उपोषणामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला होता. वैद्यकीय सल्लागार त्यांच्या आरोग्याची सातत्याने दखल घेत होते. प्रकृती खालावल्याने आणि डॉक्टरांच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. उपोषण संपवल्यानंतर आता ते उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयाच्या दिशेने प्रवास करत आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातील अशी माहिती मिळाली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    रेस्टॉरंट्स, हॉटेलनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना आपला मोर्चा आता रुग्णालयांकडे वळवला आहे. रुग्णालयातील रुग्णांना औषधांच्या नावाखाली हजारो पटीने अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार…

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सध्या राज्यात दिशा सालियान मृत्यू प्रकरण खूपच चर्चेत आहे. या प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा उघडण्यात आली असून आता सीबीआयमार्फत या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी सीबीआयला जबाब…

    Leave a Reply

    You Missed

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी