UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

देशभरातील UPI द्वारे व्यवहार करणाऱ्या लाखो लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. NPCI ने UPI साठी ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ ची सुधारित नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली १५ ऑक्टोबर २०२६ पासून निवडक P2M म्हणजे व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांसाठी लागू होईल. सामान्य युझर्ससाठी UPI सेवा मोठ्या प्रमाणावर मोफतच राहणार आहे. म्हणजेच काय P2P म्हणजे व्यक्ती ते व्यक्ती या व्यवहारांवर कोणतेच बंधन राहणार नाही. ना कोणतेही शुल्क आकारले जाणार आहे.दैनंदिन स्वरूपाच्या छोट्या खरेदीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. पण काही विशिष्ट मोठ्या व्यापारी व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार आहे.

१५ ऑक्टोबर २०२६ पासून विशिष्ट मर्चंट व्यवहारांना लागू होईल. इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींशी संबंधित शुल्कांसाठी कायदेशीर आधार निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकारने ‘पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम्स ॲक्ट, २००७’ मध्ये सुधारणा केली आहे. त्यानंतर २,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य MDR लागू करण्याबाबत १४ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आलीय.

२,००० पर्यंतच्या UPI व्यवहारांवर कोणतेही शुल्क नाही

2,000 पर्यंत पेमेंट केल्यास ग्राहकाकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्थ मंत्रालयाने सोमवारी अधिसूचना जारी करून ही स्थिती स्पष्ट केली होती. RuPay डेबिट कार्डद्वारे होणारे पेमेंट देखील या सवलतीत समाविष्ट केले आहे. ऑगस्टमध्ये संसदेत टॅक्सेशन अँड अदर लॉज ॲक्ट, 2026 मंजूर झाल्यानंतर UPI पेमेंटवरील शुल्काबाबत चर्चा सुरू झाली होती.

या नवीन नियमांमुळे लहान रकमेचे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. दोन हजार रुपयांपर्यंतच्या UPI व्यापारी व्यवहारांसाठी ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ शून्य राहील. NPCI च्या माहितीनुसार, ९५ टक्क्यांहून अधिक UPI P2M व्यवहार या मर्यादेत येतात. याचाच अर्थ पूर्वीप्रमाणेच बहुतांश लहान UPI ​​व्यवहार MDR-मुक्त राहतील.

मोठ्या व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के MDR

२,००० पेक्षा जास्त रकमेच्या सामान्य व्यापारी व्यवहारांवर ०.४ टक्के दराने MDR आकारला जाणार आहे. मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलीय. ७५,००० किंवा त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी MDR प्रति व्यवहार जास्तीत जास्त ३०० रुपये इतकाच मर्यादित असेल. UPI द्वारे ₹2,000 पेक्षा जास्त पेमेंटवर 0.4% शुल्क आकारले जाईल. प्रत्येक व्यवहारावर सुमारे 300 रुपयांपर्यंत कमाल शुल्क भरावे लागेल. ही रक्कम वेगवेगळ्या व्यवहारांवर अवलंबून असेल.

रेल्वे, इंधन आणि अत्यावश्यक सेवांसाठी केवळ ५ रुपये चार्ज

काही विशिष्ट अत्यावश्यक आणि कमी नफा-मार्जिन असलेल्या क्षेत्रांसाठी दिलासा देण्यात आलाय. रेल्वे, दूरसंचार, विमा, इंधन आणि कृषी निविष्ठा यांसारख्या क्षेत्रांमध्ये २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर ५ रुपयांचे निश्चित एमडीआर लागू होईल. यूपीआय बिझनेस पेमेंटच्या संख्येमध्ये या क्षेत्रांचा वाटा सुमारे १७ टक्के आहे, तर व्यवहारांच्या मूल्यानुसार तो जवळपास ४६ टक्के इतका आहे.

  • Related Posts

    तृतीयपंथीयांशी भेदभाव केल्यास थेट २ वर्षांची जेल! नागरी हक्क संरक्षण विभागाचा पोलिसांना तातडीच्या कारवाईचा आदेश, सोनाली चौकेकरांचा मोठा लढा फळाला

    महाराष्ट्र शासनाच्या नागरी हक्क संरक्षण विभागाने ‘तृतीयपंथी व्यक्ती अधिनियम २०१९’, ‘नियम २०२०’ आणि ‘महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी धोरण २०२४’ अंतर्गत पोलीस प्रशासनाला अत्यंत कडक निर्देश देण्यात आले आहेत. तृतीयपंथी व्यक्तींचे हक्क,…

    राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! गर्भवती पत्रकाराला ढकलल्याच्या आरोपांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, ३ नोव्हेंबरला सुनावणी

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एका गंभीर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. एका गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस जारी केली आहे. या प्रकरणाची पुढील…

    Leave a Reply

    You Missed

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    मालाडच्या आप्पा पाड्यात रविवारी भव्य महाआरोग्य शिबिर!; मोफत आरोग्य तपासणीसह महिला व ज्येष्ठांसाठी NCMC कार्डचे वाटप!

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात; इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या हस्ते कुंभमेळ्याचा शुभारंभ

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    मुंबईत ऐन ऑक्टोबरमध्ये अचानक पावसाची बॅटिंग! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा

    प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

    प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ आमनेसामने! टेंभी नाक्यावर शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन, तर ठाकरे गट आक्रमक

    “‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

    “‘सतीश गेम ओव्हर’ची चिठ्ठी अन् करेक्ट कार्यक्रम!”; प्रतापसिंह पाटलांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष

    आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व

    आकाशवाणी मुंबईवर टिटवाळ्याच्या लेखकाचा डंका! पत्रकार अजय शेलार यांच्या लेखनाला संधी, लेखणीतून उलगडणार कौटुंबिक भावविश्व

    पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पॉवर गेम! भाजपच्या स्मिता जाधवांना दणका; हर्षदा देशमुख विजयी, विजयाचा कोटा पूर्ण

    पुण्याच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा पॉवर गेम! भाजपच्या स्मिता जाधवांना दणका; हर्षदा देशमुख विजयी, विजयाचा कोटा पूर्ण

    पुणे पदवीधर व शिक्षक मतमोजणी! राष्ट्रवादी काँग्रेस हर्षदा देशमुख विजयाच्या जवळ, कौस्तुभ गावडेंची आघाडी; पण दुसऱ्या पसंतीच्या मतांचा सस्पेन्स वाढला!