“ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत. काल म्हणजे १५ सप्टेंबर रोजी रात्री त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होता. त्यांचा आजचा उपोषणाचा १९ वा दिवस असून त्यांनी उपचारही बंद केले आहेत.पाणी आणि सलाईन घेणे बंद केल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत असल्याचे वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची स्थिती चिंतेचा विषय

काल सुमारे 13 तासांचा प्रवास करून जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील पाटोदा शहरात पोहोचले. या ठिकाणी पहाटे जवळपास अडीच वाजता त्यांनी मराठा बांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्यांची प्रकृती तपासली. उपोषणाला परवानगी नसतानाही मुंबईला जाण्यावर ते ठाम आहेत. आज ते बीडच्या पाटोद्यातून अहिल्यानगरमधील श्रीगोंदा येथे मुक्काम करणार आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची स्थिती महाराष्ट्रात चिंतेचा विषय बनली आहे.

अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही

पण याचदरम्यान, जरांगे पाटील यांच्यावर काही मञ्यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगे सरकार आणि मंत्र्यांवर टीका करण्यासाठी जी भाषा वापरत आहेत, त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला. जरांगे पाटील यांच्या विरोधात मराठा मंत्री आक्रमक झाले. त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जरांगे पाटील हे जी भाषा वापरत आहेत, ती भाषा खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. गुलाबराव पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, गिरीश महाजन, संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका मांडली.

जशास तसे उत्तर दिले जाईल

जरांगे पाटील यांनी सरकावर बोलल्यास खपवून घेतले जाणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी भूमिका मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आली. तसेच सरकाराला सर्व समाजातील विद्यार्थ्यांना, तरुणांना मदत करायची आहे. मात्र, असेच सुरू राहिले तर सरकारची प्रतिमा नकारात्मक निर्माण होईल, असा सूर देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटला.

जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली

मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीहून निघण्यापूर्वीच उपचार घेण्यास नकार दिला होता. काल रात्री त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होता. त्यांची प्रकृती खालवली असल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यांनी पाटोदा येथे देखील उपचार घेण्यास नकार दिला. उपोषणामुळे प्रकृती साथ देत नाही आपण दौऱ्या रद्द करून एकटेच मुंबईला जाऊ, असं म्हणत ते स्वत:च निघाले आहेत.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    देशभरातील UPI द्वारे व्यवहार करणाऱ्या लाखो लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. NPCI ने UPI साठी ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ ची सुधारित नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली १५ ऑक्टोबर २०२६ पासून…

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी

    लातूर जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद निर्माण झाला असून, नव्याने करण्यात आलेल्या अकार्यक्षम सदस्यांच्या निवडी तातडीने रद्द करण्याची जोरदार मागणी ग्राहक चळवळीतील विविध संघटनांनी केली आहे. ‘ग्राहकतीर्थ…

    Leave a Reply

    You Missed

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    “ही भाषा खपवून घेतली जाणार नाही” मंत्रिमंडळ बैठकीत मराठा मंत्री आक्रमक; जरांगे पाटलांच्या भाषेवर सरकारचा आक्षेप; ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा इशारा

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी

    लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर राजकीय फेवर? अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून वाद पेटला; निवडी रद्द करण्याची ग्राहक संघटनांची मागणी

    मालाड गृहनिर्माण घोटाळा!६० कष्टकरी महिलांची २.४० कोटींची फसवणूक; आरोपींच्या मालमत्ता जप्तीचे आदेश, पीडित महिलांकडून कायदेशीर लढ्याबद्दल ॲड.सुभाष पगारे ,ॲड. विक्रम कपूर संपादक अमोल भालेराव यांचे आभार

    मालाड गृहनिर्माण घोटाळा!६० कष्टकरी महिलांची २.४० कोटींची फसवणूक; आरोपींच्या मालमत्ता जप्तीचे आदेश, पीडित महिलांकडून कायदेशीर लढ्याबद्दल ॲड.सुभाष पगारे ,ॲड. विक्रम कपूर  संपादक अमोल भालेराव यांचे आभार

    दिशा सालियान प्रकरण! उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; तर पुरावे दडपल्याचा संशय, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चिमाजी आढावांचीही चौकशी

    दिशा सालियान प्रकरण! उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; तर पुरावे दडपल्याचा संशय, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चिमाजी आढावांचीही चौकशी

    पंढरपुरात भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन आणि पदस्पर्श पूर्णपणे बंद

    पंढरपुरात भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन आणि पदस्पर्श पूर्णपणे बंद

    अमेरिकेत गणपतींच्या मूर्तींची किंमती ऐकून थक्क व्हाल; मराठी महिलेनं काढलेला बाप्पाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

    अमेरिकेत गणपतींच्या मूर्तींची किंमती ऐकून थक्क व्हाल; मराठी महिलेनं काढलेला बाप्पाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

    ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन; लेकाच्या आवडीची आणली मूर्ती, जागृत महाराष्ट्रशी संवाद

    ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन; लेकाच्या आवडीची आणली मूर्ती, जागृत महाराष्ट्रशी संवाद

    NKES महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ प्रदर्शन उत्साहात; संस्कृती अन् परंपरेचे धडे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    NKES महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ प्रदर्शन उत्साहात; संस्कृती अन् परंपरेचे धडे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद