अमेरिकेत गणपतींच्या मूर्तींची किंमती ऐकून थक्क व्हाल; मराठी महिलेनं काढलेला बाप्पाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या देशभरात बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आहे. बाप्पासाठी घरांपासून ते मंडळांपर्यंत सर्वांनीच जय्यत तयारी केली आहे. अगदी महिनाभर आधीपासूनच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालेली असते. सुरुवात होती ती बाप्पाची मूर्ती निवडण्यापासून. पण आपल्या देशात जसा बाप्पाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात तसाच सण अमेरिकेतही साजरा करतात. अमिरिकेतही मोठ्या संख्येनं हिंदू लोकं राहतात.त्यामुळे ते तिथेही आपली संस्कृती नक्कीच जपतात.पण तुम्हाला कधी विचार आला आहे का की अमेरिकेत गणेशोत्सव कसा साजरा केला जात असेल. किंवा बाप्पाची मूर्ती कशी असते, कितीला असते. याचं उत्तर जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

अमेरिकेतही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा 

अमेरिकेतही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे तिथे नैसर्गिक पदार्थांपासून इकोफ्रेंडली गणपती मूर्ती तयार केल्या जातात. अमेरिकेत राहणारे भारतीय नागरिक बाप्पाच्या सुंदर-सुंदर मूर्तींची प्रतिष्ठापना करतात आणि अगदी भारताप्रमाणेच भक्तिभावाने गणरायाची आराधना करतात. त्यामुळे परदेशातही बाप्पाच्या भक्तीचा जागर होताना दिसतो. अमेरिकेतील गणेश मूर्तींचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये अमेरिकेतील गणपतीच्या मूर्तींच्या किंमती पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

व्हिडीओ travelwithshilpa या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर

हा व्हिडीओ travelwithshilpa या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. शास्त्रानुसार गणपतीची मूर्ती ही पवित्र आणि नैसर्गिक पदार्थांपासून, विशेषतः मातीपासून तयार केलेली असावी, अशी पारंपरिक मान्यता आहे. मात्र, सध्या देशभरात गणपतीच्या मूर्तींसाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो. शाडूच्या मातीची मूर्ती घेणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. यामागे एक कारण म्हणजे पीओपीच्या मूर्ती दिसायला अधिक आकर्षक आणि सुबक असतात. शिवाय, मातीच्या मूर्तींच्या तुलनेत त्यांची किंमतही कमी असते. त्यामुळे अनेकजण किंमत आणि आकर्षक स्वरूप पाहून पीओपीच्या मूर्तींना पसंती देतात.

मात्र, अमेरिकेतील चित्र यापेक्षा काहीसं वेगळं असल्याचं जाणवलं. तिथे गणपतीच्या मूर्ती तयार करताना नैसर्गिक पदार्थांना प्राधान्य दिलं जातं. किंबहुना, अमेरिकेतील बहुसंख्य शहरांमध्ये पीओपीच्या मूर्ती सहज उपलब्धही होत नाहीत. त्यामुळे परदेशात राहूनही भारतीय लोक अगदी शास्त्रोक्त पद्धतीने गणेश चतुर्थी साजरी करतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

किती रुपयांना मिळते मूर्ती? किंमत पाहून थक्क व्हाल

आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मूर्ती किती रुपयांना मिळते? अमेरिकेत मूर्तींची किंमत त्यांची उंची, आकार आणि सजावट यावर ठरते. या सगळ्या मूर्ती संपूर्णपणे इकोफ्रेंडली असतात. शाडूची माती, चिकणमाती किंवा कागदाच्या लगद्यापासून या मूर्तींची निर्मिती केली जाते. ६ इंचाच्या मूर्ती १५ डॉलर्स म्हणजे जवळपास १,५०० रुपयांना मिळतात. तर, १० इंचाच्या मूर्ती ४५ डॉलर्सला म्हणजे ४,५०० रुपयांना मिळतात.

तसंच, ज्या मूर्तींवर कलाकुसर जास्त केलेली असते, त्या साधारण २०० डॉलर्स म्हणजे जवळपास २० हजार रुपयांना मिळतात. तसंच महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती, जसं की लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणपती आणि सिद्धिविनायक यांच्या प्रतिकृतीही मिळतात. पण त्यांच्याही किमती १०० डॉलर्सच्या आसपास आहेत.

व्हिडीओ ७ लाख ६१ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला 

दरम्यान हा व्हिडीओ सध्या एवढा व्हायरल होत आहे की तो आतापर्यंत ७ लाख ६१ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच, अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतंय,’गणपती बाप्पाची पूजा अमेरिकेतही केली जाते, हे पाहून खूप आनंद झाला.’ तर काहींनी अमेरिकन चलनाच्या दृष्टिकोनातून या मूर्ती फारच स्वस्त मिळतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन; लेकाच्या आवडीची आणली मूर्ती, जागृत महाराष्ट्रशी संवाद

    ‘ठरलं तर मग’ लोकप्रिय मालिकेतील अभिनेता अमित भानुशलीच्या घरी मोठ्या थाटात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. त्याच्या घरी दिड दिवसांचा बाप्पा बसतो.दरम्यान अमित जेव्हा बाप्पाला घरी आणण्याच्या तयारीत असताना जागृत महाराष्ट्रशी…

    NKES महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ प्रदर्शन उत्साहात; संस्कृती अन् परंपरेचे धडे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    विद्यार्थ्यांना समृद्ध भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी आणि प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व समजून घेता यावे, या उद्देशाने वडाळा येथील एन.के.ई.एस. महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावर आधारित भव्य प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन…

    Leave a Reply

    You Missed

    अमेरिकेत गणपतींच्या मूर्तींची किंमती ऐकून थक्क व्हाल; मराठी महिलेनं काढलेला बाप्पाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

    अमेरिकेत गणपतींच्या मूर्तींची किंमती ऐकून थक्क व्हाल; मराठी महिलेनं काढलेला बाप्पाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

    ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन; लेकाच्या आवडीची आणली मूर्ती, जागृत महाराष्ट्रशी संवाद

    ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन; लेकाच्या आवडीची आणली मूर्ती, जागृत महाराष्ट्रशी संवाद

    NKES महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ प्रदर्शन उत्साहात; संस्कृती अन् परंपरेचे धडे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    NKES महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ प्रदर्शन उत्साहात; संस्कृती अन् परंपरेचे धडे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार! मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकर्‍यांना दिलासा,पण गणेशोत्सवाच्या तयारीला फटका

    बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार! मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकर्‍यांना दिलासा,पण गणेशोत्सवाच्या तयारीला फटका

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

    राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

    राहुल गांधींकडे मच्छीमारांचे गाऱ्हाणे! महाराष्ट्र व मुंबई मच्छीमार काँग्रेसचा मोठा निर्णय; सरकारला थेट इशारा

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक

    अखेर कोल्हापूरचा काळजाचा तुकडा परतणार! ‘माधुरी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात येणार, पण पाळाव्या लागणार ‘या’ कडक