पंढरपुरात भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन आणि पदस्पर्श पूर्णपणे बंद

पंढरीच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील मूर्तीचे मूळ दर्शन भाविकांसाठी बंद राहणार आहे. मूर्तींच्या दीर्घकालीन जतन व संवर्धन करण्यात येणार आहे.

हे तीन दिवस विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मंदीर भक्तांसाठी बंद

पुरातत्त्व विभागाकडून मूर्तीवर संरक्षक आवरण म्हणजे लेपन लावण्यात आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असून भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे.त्यामुळे 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे मुखदर्शन आणि पदस्पर्श अशा दोन्ही दर्शनासाठी पूर्णपणे बंद असणार आहे.

मूर्तींवर संवर्धन प्रक्रिया होणार

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धन कार्य पार पडणार आहे. यासंदर्भात 13 सप्टेंबर रोजी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी आणि मंदिर समिती सल्लागार व परिषद सदस्यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक पार पडली. यापूर्वी 1988, 2005, 2012 आणि 2020 मध्ये मूर्तींवर संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. शेवटच्या संवर्धनाला पाच वर्षांचा काळ उलटल्याने नियमित देखभालीचा भाग म्हणून हे काम केले जात आहे.

कोल्हापूर खंडपीठाच्या आदेश अन् रासायनिक लेपन 

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाच्या दृष्टिकोनातून विठ्ठल मूर्तीवर पूरातत्व विभागाच्या सल्ल्याने रासायनिक लेपण प्रक्रिया होणार आहे. जून महिन्यातच ही रासायनिक लेपण प्रक्रिया होणार होती. मात्र रासायनिक लेपण की आयुर्वेदिक लेपन या प्रश्नावर न्यायालयीन लढाई झाल्यानंतर अखेर कोल्हापूर खंडपीठाच्या आदेशाने पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानेच विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया येत्या 23 ते 25 सप्टेंबर रोजी पंढरपुरात होणार आहे असे मंदिर प्रशासनाने कळवले आहे.

मूर्तींची झिज होत आहे

पंढरपूर मंदिरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. मंदिरात दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. मंदिरातील विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तींची झिज होत आहे.त्यामुळे ठराविक काळानंतर या मूर्तींना लेपन करण्यात येते. या काळात मंदिर भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात येत असते.

भाविकांनी या काळात मंदिर समितीला सहकार्य करण्याचे आवाहन

मूर्तीचे जतन आणि संवर्धन ही मंदिर समितीची प्राथमिक जबाबदारी आहे. या प्रक्रियेत मूर्तीचे प्राचीन स्वरूप, धार्मिक परंपरा आणि भाविकांच्या श्रद्धेचा पूर्ण आदर ठेवून अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम केले जाईल, असा विश्वास सहअध्यक्ष औसेकर यांनी व्यक्त केला. पुणे पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली हे तांत्रिक काम पूर्ण केले जाणार आहे. भाविकांनी या काळात मंदिर समितीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    दिशा सालियान प्रकरण! उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; तर पुरावे दडपल्याचा संशय, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चिमाजी आढावांचीही चौकशी

    बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले होते…

    अमेरिकेत गणपतींच्या मूर्तींची किंमती ऐकून थक्क व्हाल; मराठी महिलेनं काढलेला बाप्पाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

    सध्या देशभरात बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आहे. बाप्पासाठी घरांपासून ते मंडळांपर्यंत सर्वांनीच जय्यत तयारी केली आहे. अगदी महिनाभर आधीपासूनच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालेली असते. सुरुवात होती ती बाप्पाची…

    Leave a Reply

    You Missed

    दिशा सालियान प्रकरण! उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; तर पुरावे दडपल्याचा संशय, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चिमाजी आढावांचीही चौकशी

    दिशा सालियान प्रकरण! उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; तर पुरावे दडपल्याचा संशय, मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी चिमाजी आढावांचीही चौकशी

    पंढरपुरात भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन आणि पदस्पर्श पूर्णपणे बंद

    पंढरपुरात भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन आणि पदस्पर्श पूर्णपणे बंद

    अमेरिकेत गणपतींच्या मूर्तींची किंमती ऐकून थक्क व्हाल; मराठी महिलेनं काढलेला बाप्पाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

    अमेरिकेत गणपतींच्या मूर्तींची किंमती ऐकून थक्क व्हाल; मराठी महिलेनं काढलेला बाप्पाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

    ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन; लेकाच्या आवडीची आणली मूर्ती, जागृत महाराष्ट्रशी संवाद

    ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन; लेकाच्या आवडीची आणली मूर्ती, जागृत महाराष्ट्रशी संवाद

    NKES महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ प्रदर्शन उत्साहात; संस्कृती अन् परंपरेचे धडे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    NKES महाविद्यालयात ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ प्रदर्शन उत्साहात; संस्कृती अन् परंपरेचे धडे, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार! मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकर्‍यांना दिलासा,पण गणेशोत्सवाच्या तयारीला फटका

    बाप्पाच्या आगमनापूर्वी मुसळधार! मुंबईसह राज्यात पावसाची जोरदार हजेरी; शेतकर्‍यांना दिलासा,पण गणेशोत्सवाच्या तयारीला फटका

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    मनोज जरांगे पाटलांचे एल्गार! अखेर आंदोलनाची तारीख ठरली,असं असणार जरांगेंचं मुंबई आंदोलनाचे संपूर्ण शेड्यूल

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    बाप्पाची मूर्ती घरी आणताना चेहरा रुमालाने का झाकतात? ‘दृष्ट’ की ‘पावित्र्य’? नक्की काय कारण,जाणून घ्या

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक

    बनावट पासपोर्ट, पाकिस्तान कनेक्शन! ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून फरार दहशतवाद्याच्या मुलीला अटक