राज ठाकरेंच्या रायगड दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का! अंतर्गत वाद चव्हाट्यावर,पदाधिकारी का देत आहेत राजीनामे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या आगामी ९ ऑगस्टच्या रायगड जिल्हा दौऱ्यापूर्वी पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. वरिष्ठ नेते दौऱ्याच्या तयारीला लागले असतानाच, दुसरीकडे दक्षिण रायगड आणि श्रीवर्धन तालुक्यात मनसेतील अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे.

श्रीवर्धन तालुका प्रसार माध्यम प्रमुखांचा राजीनामा

गेल्या ५ वर्षांपासून श्रीवर्धन तालुका प्रसार माध्यम प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे सुनील विठोबा रिकामे यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा तालुकाध्यक्ष मृदासभाई काशिनाथ तोंडलेकर यांच्याकडे सोपवला.

वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे पत्रात त्यांनी नमूद केले असले, तरी “मी पक्षातील पदाचा राजीनामा देत असून, माझी निष्ठा कालही, आजही आणि यापुढेही राजसाहेब ठाकरे व संपूर्ण ठाकरे परिवाराप्रती कायम राहील,” असे स्पष्ट करत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

वरिष्ठ नेत्याच्या मनमानी कारभारामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण रायगडमधील एका वरिष्ठ नेत्याच्या मनमानी आणि अहंकारी वागण्याला कंटाळून कार्यकर्ते अत्यंत नाराज झाले आहेत. या गैरवर्तनामुळेच स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, येत्या काही दिवसांत अनेक महत्त्वाचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

राज ठाकरेंचा ९ ऑगस्टचा रायगड दौरा कसा असणार?

नवीन कार्यालयांचे उद्घाटन: मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलादपूर येथील पत्रकार परिषदेत या दौऱ्याची अधिकृत घोषणा केली होती. दौऱ्यादरम्यान मुख्य कार्यक्रम म्हणजे माणगाव, पेण आणि पनवेल येथे पक्षाच्या नवीन कार्यालयांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

महामार्ग पाहणी: रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी राज ठाकरे करणार आहेत.

राज ठाकरेंच्या आगमनापूर्वी वाद शमणार की असंतोषाचा भडका उडणार?

राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वीच दक्षिण रायगड मनसेतील अंतर्गत वाद आणि राजीनाम्यांच्या सत्रामुळे पक्षाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. राज ठाकरेंच्या आगमनापूर्वी हा वाद शमतो की असंतोषाचा भडका उडतो, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार