ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने ने दारू बनवणाऱ्या अनेक कंपन्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत त्यांनी काही लोकप्रिय ब्रँड्स बॅन करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. जसं की,या कारवाईमध्ये ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स, बॅगपाइपर, रॉयल चॅलेंज आणि अँटीक्विटी ब्ल्यू या ब्रँड्सच्या काही उत्पादनांचा समावेश आहे. या कंपन्यांवर आरोप आहे की त्यांनी या उत्पादनांबाबत नियमभंगाच्या आरोपांवर कारवाई केली आहे.

FSSAIच्या कारवाई मागील नेमकं कारण?

FSSAI च्या तपासात काही उत्पादकांनी रम आणि व्हिस्कीला नैसर्गिकरीत्या परिपक्व झाल्यासारखा स्वाद आणि सुगंध मिळावा यासाठी कृत्रिम अथवा “Nature Identical” फ्लेवरिंगचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एका अहवालानुसार, फूड रेग्युलेटरने सांगितले की तपासणी आणि लॅब टेस्टिंगमध्ये आढळले की काही कंपन्या रम आणि व्हिस्कीमध्ये बाहेरील फ्लेवर मिसळत होत्या. नियमांनुसार त्यांना कच्चा माल, फर्मेंटेशन, डिस्टिलेशन आणि मॅच्युरेशन याद्वारे नैसर्गिकरित्या चव आणि सुगंध विकसित होऊ द्यावा लागतो.

स्टँडर्ड रम किंवा व्हिस्कीच्या नावाने ग्राहकांची फसवणूक 

FSSAI चे म्हणणे आहे की अशी उत्पादने स्टँडर्ड रम किंवा व्हिस्की म्हणून विकली जात आहेत. तर ती मुख्यतः न्यूट्रल अल्कोहोल किंवा एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलपासून बनलेली असतात. त्यात पेयांची खरी चव नसते. अथॉरिटीने सांगितले की या उत्पादनांना रम-फ्लेव्हर्ड स्पिरिट किंवा व्हिस्की-फ्लेव्हर्ड स्पिरिट म्हणून लेबल केले जावे जेणेकरून त्यांची खरी ओळख कळेल.

तसेच अथॉरिटीने एका निवेदनात म्हटले आहे की, “काही कंपन्या बाहेरील फ्लेवर मिसळतात जे उत्पादनाच्या खऱ्या सुगंध आणि चवीची नक्कल करतात. कंपन्या नंतर ते स्टँडर्ड उत्पादन म्हणून विकतात, ज्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होते. कंपन्या नैसर्गिकरित्या चव विकसित करण्यासाठी माल्ट किंवा द्राक्षांसारख्या बेस मटेरियलचा वापर करत नाहीत. या कंपन्या मुख्यतः स्पिरिट/न्यूट्रल अल्कोहोलचा वापर करतात. त्यात कोणतीही खास चव नसते आणि म्हणून फ्लेवर मिसळतात.”

ग्राहकांची दिशाभूल?

FSSAI ने सांगितले की अशी उत्पादने केवळ निकृष्ट दर्जाचीच नसतात तर स्टँडर्ड श्रेणीच्या नावांचा वापर करून ती चुकीच्या पद्धतीने विकली जातात. रम-फ्लेव्हर्ड स्पिरिट किंवा व्हिस्की-फ्लेव्हर्ड स्पिरिट इत्यादी म्हणून ओळखले जातात. तसेच पॅकमध्ये उत्पादनाच्या खऱ्या स्वरूपाबद्दल कोणतीही माहिती दिली जात नाही.

रेग्युलेटरने ओल्ड माँक XXX रमच्या एका प्रकारावर ‘७ इयर्स ओल्ड ब्लेंडेड’ हा दावाही दिशाभूल करणारा असल्याचे आढळल्याचे सांगितले. तपासणीत आढळले की या रमचा मुख्य घटक न्यूट्रल स्पिरिट आहे, तर मॅच्युर रम स्पिरिट त्याचा फारच छोटा भाग आहे. तपासणीच्या निकालांनुसार तो ५% पेक्षाही कमी आढळला. हे स्पष्टपणे नियमांचे उल्लंघन आहे.

बॅन करण्यात आलेले ब्रँड्स

ओल्ड मॉन्क -काही व्हेरियंट्स
मॅकडॉवेल्स
बॅगपाइपर
रॉयल चॅलेंज
अँटिक्विटी ब्लू व्हिस्की
ओल्ड कास्क डीलक्स XXX रम
असोसिएटेड अल्कोहोल अँड ब्रुअरीजच्या सेंट्रल प्रोव्हिन्स व्हिस्की

FSSAI ने नोंदवलेले प्रमुख आक्षेप

विक्रीस मनाई केलेली काही उत्पादने सुमार दर्जाची तसेच दिशाभूल करणारी असल्याचा आरोप.
रम किंवा व्हिस्की मूळ घटकांऐवजी फ्लेवरिंगच्या साहाय्याने तयार केल्याचा आक्षेप.
कृत्रिम फ्लेवरिंगमुळे उत्पादनाची मूळ चव आणि सुगंध बदलल्याचे निरीक्षण.
मोलेससपासून रम किंवा माल्टपासून व्हिस्की तयार करण्याऐवजी फ्लेवरिंग वापरल्याने मूळ वैशिष्ट्यांवर परिणाम झाल्याचा दावा.
उत्पादन कोणत्या घटकांपासून तयार केले आहे, याचा स्पष्ट उल्लेख लेबलवर नाही
अशी उत्पादने “Rum Flavoured Spirit” किंवा “Whisky Flavoured Spirit” या स्वरूपात विक्रीस ठेवणे अपेक्षित असल्याचे नमूद.

कंपन्यांची भूमिका काय आहे?

या कारवाईनंतर संबंधित उत्पादनांची विक्री काही ठिकाणी तात्पुरती थांबवली जाऊ शकते. अंतिम न्यायालयीन किंवा नियामक निर्णय येईपर्यंत परिस्थितीत बदल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, संबंधित कंपन्यांनी आपण नियमांचे पालन केल्याचा दावा केला असून काही कंपन्यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्या मते हा वाद उत्पादनाच्या सुरक्षिततेपेक्षा नियमांच्या व्याख्येशी संबंधित आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    भारताच्या डीप-टेक क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या एका मोठ्या निधीवाटपावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. पहिल्या टप्प्यात २२ खाजगी कंपन्यांना २,१९२ कोटी रुपयांची सवलतीचे कर्ज मंजूर करण्यात आलं…

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार