तकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका!अनलॉग पनीरवर बंदी;55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्सनाही झटका

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात धडाकेबाज कारवाई करत आहेत.तुकाराम मुंढेंनी आणखी एक मोठा दणका दिला आहे. FDA ने महाराष्ट्रात ॲनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर एका वर्षाची बंदी घातली आहे. आता पर्यंत 55 कोटी रुपयांच ॲनालॉग चीज नष्ट करण्यात आले असून अनेकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

अनलॉग पनीरवर बंदी

FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांन मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात ॲनालॉग पनीर म्हणजे नॉन डेरी पनीर विकल जात होतं. ते वनस्पती किंवा पामतेलचा वापर करुन तयार करण्यात आलं असतं. पण पनीर समजून ते नागरिकांना खायला दिलं जाऊ शकतं. पनीर की अनलॉग पनीर हे सर्वसामान्य नागरीक बऱ्याचदा ओळखू शकत नाहीत. तसेच ते आरोग्यासाठी घातक आहे.त्याचा विपरीत परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो.त्यामुळे अनलॉग पनीरवर बंदी घालण्यात आली असल्याचं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात 30 जुलै रोजी अधिसूचना काढून उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, विक्रीवर आणि वितरणावर बंदी घातली आहे.

दंडात्मक कारवाई होणार

पुढे बोलताना मुंढे यांनी सांगितले की, “आम्ही 308 ठिकाणांवरून पनीरचे नमुने घेतले होते, त्यातील 35 टक्के नमुने घातक होते. आता आगामी काळात विशेष मोहिम राबवणार आहोत, जिथे गोदामं आहेत तिथे तपासणी होणार आहे. आता आगामी काळा आस्थापनांनी दुधाच्याच पनीरचा वापर करावा, कुणी बनावट पनीर विकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करणार आहोत.”

55 कोटींचा 28 लाख किलो साठा जप्त

एवढंच नाही तर अन्न पदार्थांसंदर्भात 25 मे ते 31 जुलै पर्यंत मोठी कारवाई करण्यात आली. 3 हजार 136 आस्थापनांची तपासणी करण्यात आली, तसेच 774 आस्थापन्ना नोटीसा पाठवण्यात आली आहे. तसेच 165 आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले. या कारवाईत 28 लाख 66 हजार 96 किलो साठा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत 55 कोटी रुपये होती. तसेच राज्यातील 890 फूड आऊट लेट्सची तपासणी करण्यात आली.तसेच 329 हॉटेलना सुधारणा नोटीस बजावल्या असून 116 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच 11 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत ही FDA नं केलेली मोठी कारवाई आहे.

हॉटेल देखील ॲनालॉग पनीर वापरू शकणार नाहीत

पनीर हा दुधाचा पदार्थ आहे पण ॲनालॉग पनीरमध्ये नॉन दुग्धजन्य पदार्थ आढळले आहेत, त्यामुळे त्यावर बंदीचा निर्णय घेतला आहे. अशा पनीरची छुप्या पद्धतीने विकली जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सगळे आदेश उत्पादक प्रक्रिया करणारे, वाहतुकदार , वितरक, विक्रेते यांच्यासाठी बंधनकारक असणार आहेत. आता हॉटेल देखील ॲनालॉग पनीर वापरू शकत नाही, कारण या पनीरमध्ये प्रोटीन पेक्षा वनस्पती चरबी आढळली आहे. जी शिक्षा गुटखाबंदी संदर्भात आहे, तीच शिक्षा ॲनालॉग पनीर विकणाऱ्यांना दिली जाणार आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार