भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२६ च्या दहाव्या दिवशी, शनिवारी, भारताने आठ सुवर्णपदके जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये 1 जुलै हा दिवस भारतीय क्रीडा इतिहासातील सुवर्ण क्षण ठरला आहे. भारतीय बॉक्सर्संनी रिंगमध्ये असा काही धुमाकूळ घातला की,अवघ्या 9 तासांच्या अवधीत भारताच्या खात्यात 7 सुवर्ण आणि 3 रौप्य अशी तब्बल 10 पदके जमा झाली. बॉक्सिंगच्या मैदानात सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकून भारत या स्पर्धेत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकाच आवृत्तीत बॉक्सिंगमध्ये सात सुवर्णपदके जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.या ऐतिहासिक कामगिरीसह भारताने पदकतालिकेत आतापर्यंत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य अशा एकूण 38 पदकांसह चौथ्या स्थानी आहे.

भारतासाठी रौप्यपदकांची सुरुवात

भारतासाठी रौप्यपदकांची सुरुवात प्रवीण चित्रवेल याने पुरुषांच्या ट्रिपल जंप स्पर्धेत केली. त्यानंतर बॉक्सिंगमध्ये जादूमणी सिंह याने पुरुषांच्या 55 किलो गटात रौप्यपदक पटकावले. पॅरा अॅथलेटिक्समध्ये शुभम जुयाल याने शॉटपुट प्रकारात रौप्य जिंकून भारताच्या पदकांमध्ये भर घातली. अनुभवी बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिने महिला 75 किलो गटात रौप्यपदक मिळवले. दिवसातील शेवटच्या बॉक्सिंग अंतिम सामन्यात नरेंदर बेरवाल यालाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.त्यानंतर जूडोमध्ये उन्नती शर्मा हिने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकसंख्येत आणखी भर घातली.

अंकुश पंघालने पटकावले सुवर्ण

भारतासाठी दिवसातील शेवटचे सुवर्णपदक अंकुश पंघाल याने जिंकले. पुरुषांच्या 80 किलो गटाच्या अंतिम फेरीत त्याने इंग्लंडच्या डिमेजी शिट्टूचा 4-1 अशा विभाजित निर्णयाने पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. बॉक्सिंगमध्ये भारताचे हे सातवे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी सचिन याने पुरुषांच्या 60 किलो गटाच्या अंतिम फेरीत नामिबियाच्या ट्रायगेन मॉर्निंग नदेवेलोचा 3-2 अशा विभाजित निर्णयाने पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते.

लव्हलिनाला रौप्यावर मानावे लागले समाधान

महिला 75 किलो गटाच्या अंतिम सामन्यात लव्हलिना बोरगोहेनचा सामना ऑस्ट्रेलियाच्या एम्मा सुई ग्रीनट्री हिच्याशी झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत एम्माने 4-1 अशा विभाजित निर्णयाने विजय मिळवत लव्हलिनाला रौप्यावर समाधान मानावे लागले.

अरुंधतीने जिंकले सुवर्ण

महिला 70 किलो गटात भारताच्या अरुंधती हिने इंग्लंडच्या चेंटेले रीडचा 5-0 अशा एकमताने निर्णयाने पराभव करत शानदार सुवर्णपदक जिंकले. दिवसाची सुरुवात भारतासाठी सुवर्णमयी ठरली. प्रीती पवार हिने महिला 54 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर जैस्मिन लंबोरिया हिने महिला 57 किलो गटात शानदार कामगिरी करत भारताला आणखी एक सुवर्ण मिळवून दिले.

प्रिया घंघासची उत्कृष्ट कामगिरी

महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या प्रिया घंघासने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. तिने अटीतटीच्या लढतीत ४-१ असा विजय मिळवला.प्रियाने लढतीची जोरदार सुरुवात केली, पण तिची प्रतिस्पर्धी अल-अहमदियेने काही अचूक ठोसे मारून प्रत्युत्तर दिले. अंतिम फेरीत दोन्ही बॉक्सरमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

साक्षीने ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंक

भारताच्या साक्षी चौधरीने महिलांच्या ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकले. तिने इंग्लंडच्या खेळाडूला ५-० ने हरवले.
साक्षीने संपूर्ण लढतीत उत्कृष्ट रणनीतीचा वापर केला. तिने आपल्या डाव्या हाताने प्रतिस्पर्ध्याचे ठोसे अडवले आणि उजव्या हाताने अचूक प्रतिहल्ले केले.

भारताने जिंकली 13 सुवर्णपदके

दिवसाची सुरुवात प्रीती पवारने महिलांच्या 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून केली. त्यानंतर जस्मिन लँबोरियाने महिलांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून भारताला दिवसातील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. दिवसाच्या अखेरीस, भारतीय बॉक्सर अंकुश पांघलनेही उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. भारताने या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आतापर्यंत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 8 कांस्य पदकांसह एकूण 38 पदके जिंकली आहेत. गुणतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

त्यामुळे एकंदरीतच शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी केली.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

“सुभाष चंद्रांचे कर्ज माफ केले नसते तर…”; २,००० वरील चार्जेसबद्दल अशनीर ग्रोव्हर यांचा सरकारला खोचक सवाल,२० वर्षे UPI मोफतबाबतचा मांडला हिशोब

भारतपेचे सह-संस्थापक आणि शार्क टँकचे माजी परीक्षक अशनीर ग्रोव्हर यांनी, ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर आणि व्यापारी पेमेंटवर शुल्क आकारण्याच्या धोरणांवरून केंद्र सरकार आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियावर…

UPI युझर्ससाठी मोठी बातमी! १५ ऑक्टोबरपासून ‘MDR’च्या नव्या नियमांची अंमलबजावणी;२,००० रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर शून्य शुल्क?

देशभरातील UPI द्वारे व्यवहार करणाऱ्या लाखो लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. NPCI ने UPI साठी ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ ची सुधारित नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली १५ ऑक्टोबर २०२६ पासून…

Leave a Reply

You Missed

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा