“श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

“श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव”

विराळ, ता. जळकोट, जि. लातूर येथे श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, मुलांना शैक्षणिक मदत देखील केली जाते. या कार्यातून अध्यक्ष नरसिंग सोनटक्के यांनी आदर्श शिक्षक व समाजसेवक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

श्री समर्थ सद्गुरु धोंडू तात्या महाराज यांच्या 94 व्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्या अंतर्गत आज, शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता विराळ येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात वैद्यकीय, अभियांत्रिकी, शैक्षणिक, सामाजिक, कृषी, पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा
“गौरव कार्याचा – सन्मान भूमिपुत्रांचा”
या उपक्रमांतर्गत सन्मान करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास माजी मंत्री तथा आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या शुभहस्ते सन्मान होणार असून, प्रमुख उपस्थितीमध्ये
मनमथआप्पा किडे, उषाताई संभाजी पाटील तळेगावकर, रामचंद्र भाऊ तिरुके, धर्मपाल देवशेट्टे, सुनीताताई संभाजी कोसंबे, प्राध्यापक माधव वाघमारे, राहुल बालाजी झोले, शिवकांता गंगाधर ताकबिडे यांचा समावेश आहे.

तसेच या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष नरसिंग सोनटक्के, उपाध्यक्ष ज्ञानोबा जाधव, उपाध्यक्ष संजय येरनाळे, कोषाध्यक्ष देवराव सोनटक्के, सचिव शिवशांभ सोनटक्के तसेच सर्व सदस्य श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठान व समस्त विराळ ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी गावातील तसेच परिसरातील सर्व नागरिक, भाविक भक्त आणि सन्मानार्थी यांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

“सिनेमा आणि शेती — दोघांचीही पेरणी मेहनतीची, पण कापणी नशिबाची!”

सिनेमा आणि शेती — दिसायला दोन वेगवेगळे जग, पण दोघांचा आत्मा एकच आहे… मेहनत, जोखीम आणि आशा. शेतकरी पिकाची पेरणी करतो, दिवस-रात्र घाम गाळतो, पाऊस, वादळ, कर्ज आणि बाजारभाव यांचा…

Leave a Reply

You Missed

“श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

“श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठानचा उपक्रम… विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण सन्मानित

  • By Admin
  • March 18, 2026
लायन्स क्लब ऑफ महाड तर्फे अनिल चव्हाण  सन्मानित

“रंजन गोगोईंचा ६ वर्षांचा हिशोब: काम शून्य, सुविधा पूर्ण?”

“रंजन गोगोईंचा ६ वर्षांचा हिशोब: काम शून्य, सुविधा पूर्ण?”

मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

  • By Admin
  • March 17, 2026
मुंबईतील मालवणी, मार्वे आणि अक्सा परिसरातील बहुकोटींच्या जमीन विकास वादप्रकरणात Bombay High Court ने अत्यंत महत्त्वाचा निर्णय

पाकिस्तानचे 7 फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचले नाहीत,114 धावांत ऑलआउट

पाकिस्तानचे 7 फलंदाज दुहेरी आकड्यापर्यंतही पोहोचले नाहीत,114 धावांत ऑलआउट

मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

  • By Admin
  • February 27, 2026
मराठी मूडच्या ‘बोला मराठी’ उपक्रमाचा डिजिटल डंका अन्य देशांतील अमराठी भाषिकांनीही मराठी सादरीकरण केले

मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

  • By Admin
  • February 23, 2026
मोठा झटका! ५०% आरक्षण ओलांडलेल्या २२ जिल्हा परिषद निवडणुका स्थगित – सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश

“झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

  • By Admin
  • February 13, 2026
“झिंबाब्वेचा पराक्रम, दिग्गज ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर”

2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव

  • By Admin
  • February 8, 2026
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! स्वराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बैठकीत निर्णय – डॉ आदर्श भालेराव