गेल्या दशकांहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या मालवणी टाऊनशीप शाळेचं खासगीकरण करण्यात आलं. शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस, पालक आणि स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला. बिल्डर मि त्रांसाठी मनपा शाळा एका पाठोपाठ एक बंद करून किंवा त्याला खासगी लोकांच्या घशात घालून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अधिकार मारण्याचा कारस्थान महायुती करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. यावेळी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. दरम्यान स्थानिक आमदार असलम शेख, वर्षा गायकवाड़ सुद्धा यावेळी उपस्थित होत्या आमचा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार असल्याचं विधान वर्षा गायकवाड यांनी केलंय







