राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून रखडले असल्याने उपासमारीची पाळी आली आहे. ईतकेच नव्हे तर मानसिक आणि आर्थिक दडपणाचे ओझे घेऊन जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आहेत . तरीही महाराष्ट्र राज्य सरकार आणि आरोग्य सेवा संचालक, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव काय करित आहेत हे कळत नाही. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक आमदार आणि खासदारांनी या गंभीर बाबीकडे पराकोटीचे लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट राज्य सरकार आमदार आणि खासदार यांच्या खात्यात काही गरज नसतांना दिवाळीपुर्वी वेतन देणार आहे. मात्र आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून वेतन देण्यात अपयशी ठरले आहे.वेतन दिवाळीच्या अगोदर मिळाले पाहिजे यासाठी सर्व स्थानिक आमदार आणि खासदार यांनी हा प्रश्न अत्यंत जलदगतीने शासनाच्या दरबारात पाठवुन न्याय मिळवून द्यावा. आरोग्य मंत्री , सचिव आणि आयुक्त यांनी या बाबत तात्काळ लक्ष वेधून वेतन करावे. PFMS पद्धतीने वेतन अदा करावे अशी अँक्टिव्हिटी केल्याशिवाय वेतन दिवाळी पूर्वी होणार नाही तसेच शासनाने जिल्ह्यांना लिमिट देण्यासाठी खूप उशीर केलेला आहे . नवीन प्रणाली असल्याने कर्मचारी सुद्धा जीव लावून प्रयत्न करत आहेत .यात शंका नाही परंतु तांत्रिक गोष्टी बघता दिवाळी अगोदर वेतन होणे आवश्यक आहे . कंत्राटी कर्मचारी यांना वेतन नसल्यामुळे निराशा निर्माण झाली आहे. शासन दरबारी असलेल्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे कंत्राटी कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे दिवाळी सारखा सण काळोख्यात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या बाबत सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांच्या माहिती नुसार महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष ॲड शिवाजी डमाळे यांनी आरोग्य मंत्री , आरोग्य संचालक, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , यांना तात्काळ भ्रमणध्वनी वरुन आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपुर्वी वेतन देण्यात यावे अशा सूचना दिल्या.
तसेच आरोग्य मंत्री , वरिष्ठ अधिकारी यांना फोन करून जुन्या पद्धतीने वेतन करण्याबाबत सूचना दिल्या.








