मुंबईसह संपूर्ण राज्यात CNG Maharashtra CNG crisis नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य गॅस पाइपलाइनला झालेल्या नुकसानीमुळे गेल दोन दिवसांपासून पुरवठा बाधित असून मुंबई आणि ठाण्यातील CNG पंपांवर सलग दुसऱ्या दिवशीही लांबलचक रांगा दिसत आहेत. अनेक पंपांवर पुरवठा थांबल्याने नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
ऑफिसच्या वेळेत नागरिकांची दमछाक
सकाळची ऑफिसची वेळ… त्यात CNG तुटवडा… आणि यामुळे ऑटो व टॅक्सी मिळणे अक्षरशः कठीण झाले आहे.
जिथे पहाल तिथे “ऑटो कुठे? टॅक्सी कुठे?” अशी आरडाओरड सुरू आहे.
शालेय वाहतूक, कार्यालयीन प्रवासी, महिला, वृद्ध — सर्वांनाच या गोंधळाचा मोठा फटका बसत आहे.ऑटो–टॅक्सी चालकांचे मनमानी दर : 20–30 रुपये जास्त मागणी
पुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक ऑटो व टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून 20 ते 30 रुपये जादा घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
अनेक ठिकाणी चालक उघडपणे सांगत आहेत—
“CNG नाही… पेट्रोलवर गाडी चालवतोय… जादा पैसे द्या नाहीतर पुढे जा!”
प्रवाशांचा प्रश्न अगदी रास्त आहे की —मिटर रेट 25 रुपयांपेक्षा जास्त पेट्रोलसाठी असतो का? की तो CNG वर चालणाऱ्या गाड्यांसाठी असतो?
नागरिक या मनमानीला बळी पडत आहेत, कारण ऑटो-टॅक्सी मिळणंही अवघड झालं आहे.
पोलीसही मूक? निर्मात्याचा धक्कादायक अनुभव एका मराठी निर्मात्याने “नाव न सांगण्याच्या अटीवर” सांगितलेला प्रसंग तर अधिक गंभीर आहे.
त्यांनी एका चालकाला जादा भाड्यावरून प्रश्न विचारताच… आणि “चल, पोलिसांकडे तक्रार करू” असे म्हणताच…चालक म्हणाला — ‘हो चला!’हा आत्मविश्वास कसा?निर्माते सांगतात— “पोलिसांनी त्याला बसवले… काही क्षणात सोडूनही दिले. त्यांना माहिती आहे की ‘आपलेच सहकारी आहेत’.”
या घटनेमुळे नागरिकांमध्ये पोलिस यंत्रणेवरचा विश्वास धक्का बसत असून कायदा-सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सरकारचे नियंत्रण सुटले का?
CNG तुटवडा — ऑटो-टॅक्सींची मनमानी — पोलिसांची दुर्लक्ष — नागरीकांचे वाढते हाल…
या सर्वातून व्यवस्थेचे नियंत्रण ढासळल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
वाहतूक, इंधन, सार्वजनिक सेवा, नागरिकांचे दैनंदिन आयुष्य आणि सुरक्षितता — सगळेच प्रश्नचिन्हाखाली.
नागरिक विचारत आहेत—
“सरकार कुठे आहे?”
“व्यवस्था चालवणारा कुठे झोपला आहे?”
“जादा पैसे देणे बंधनकारक आहे का?”
लोकांचे मत स्पष्ट आहे —
या परिस्थितीने सरकारने व्यवस्थेवरील पकड गमावली आहे.
नागरिकांचा विश्वास हादरला आहे.
सध्याची परिस्थिती
राज्यभरात CNG पुरवठा खंडित
पंपांवर 1 ते 2 किमी लांबीच्या रांगा
ऑटो-टॅक्सी चालक उघडपणे जादा रक्कम मागत आहेत
प्रवाशांशी वाद, असुरक्षितता वाढ
पोलिस कारवाईचे नाव नाही
नागरिक, विद्यार्थी, ऑफिस कर्मचारी अडचणीत
आणीबाणीच्या सेवांनाही फटक










