Three bike-borne assailants open fire at a man in Mumbai’s Kandivali
मुंबईच्या कांदिवली वेस्ट येथील चारकोप परिसरातील गरुड पेट्रोल पंपाजवळ बुधवारी दुपारी धाडसी गोळीबाराची घटना घडली. तीन अज्ञात व्यक्तींनी एका पुरुषावर गोळीबार करून त्याला जखमी केले. जखमी व्यक्तीला तात्काळ ऑस्कर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. Three bike-borne assailants open fire
चारकोप पोलिसांनी माहिती मिळताच लगेच घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार, दुपारी साधारण 2 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. पीडित व्यक्ती रस्त्यावरून चालत असताना तीन हल्लेखोर बाईकवर येऊन त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला.
पोलिसांच्या मते, तीन्ही आरोपींनी तोंडावर मास्क घातले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. सध्या पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.
pen fire at a man in Mumbai’s Kandivali











