मालाड, मुंबई
मालवणीतील अंबोजवाडी परिसरात मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन समाजासाठी राखून ठेवलेल्या पाच एकर जागेवर अद्यापही स्मशानभूमी आणि दफनभूमीचा विकास झाला नाही. २०१८ साली ही जागा महापालिकेला अग्रिम ताब्यात देण्यात आली होती. मात्र २०२५ उजाडला तरी देखील प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार अस्लम शेख यांनी अंबोजवाडीतील दफनभूमी व स्मशानभूमीचा प्रश्न ठामपणे मांडला. गेल्या १० वर्षांपासून या कामासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार शेख यांनी याप्रश्नी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली.
“जर या स्मशानभूमी व कब्रस्तानाचे स्थान बदलले गेले, तर पुन्हा पुढील १० वर्षे संघर्ष करावा लागेल. त्यामुळे आरक्षित जागेवरच हे काम तातडीने सुरू व्हावे,” अशी मागणी आमदार शेख यांनी केली.
या मुद्याला आता गती मिळण्याची शक्यता असून, स्थानिक नागरिकांसाठी ही एक दिलासादायक पावले ठरू शकतात.










