भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्ली येथे आयोजित बी.एल.ओ. व पर्यवेक्षकांसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात महाड तालुक्यातील भिवघर शाळेचे मुख्याध्यापक व बी.एल.ओ. रुपेश राजू पार्टे यांनी यशस्वी सहभाग नोंदवला.
दि. ३ व ४ जुलै २०२५ रोजी IIIDEM, भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था, नवी दिल्ली येथे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, झारखंड व लडाख येथील अधिकारी सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून १४४ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ११ पर्यवेक्षक व २ जिल्हाधिकारी यांचा सहभाग होता.
प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल पार्टे यांना महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी किरण शार्दुल यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या वेळी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले, प्रांताधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे, गटशिक्षणाधिकारी राजन सुर्वे, सरपंच संदीप गायकवाड, उद्योजक गोपाळ मोरे, तसेच अनेक अधिकारी, शिक्षक व ग्रामस्थांनी . पार्टे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले









