मुंबई – सोमवारी रात्री उशिरा जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आणि आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. स्वतः धनखड यांनी १० जुलैला झालेल्या एका कार्यक्रमात, मी ऑगस्ट २०२७ मध्ये निवृत्त होईन असं म्हटलं होतं. त्यामुळंच त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यावर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. पण धनखड यांच्या राजीनाम्यानंतर देशाचा पुढचा उपराष्ट्रपती कोण होणार ? याच्या चर्चाही आता सुरू झाल्यात. यामध्ये काही नावांच्या चर्चा होतायत. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव आघाडीवर असल्याचंही सांगितलं जातंय. नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती पद देण्यासाठी जगदीप धनखड यांच्याकडून राजीनामा घेण्यात आल्याचंही बोललं जातंय. काहींचे म्हणणे आहे कि हा भाजपाचा मोठा डाव आहे आता उपराष्ट्रपतीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा का होतेय? जाणून घेऊयात
बिहारमध्ये वर्षाकाठी निवडणुका होऊ घातल्यात. ही निवडणूक भाजपा आणि जेडीयू पक्ष एकत्रित लढणार आहेत. भविष्यात भाजपाला बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री हवाय पण नितीश कुमार जोवर बिहारच्या राजकारणात सक्रिय आहेत तोवर तरी हे शक्य नाहीच. नितीश कुमार यांचा कुर्मी समाज आणि ओबीसी समाजावर मोठा प्रभाव आहे, पक्कड आहे. त्यामुळेच बिहारमध्ये नितीश कुमारांची कोणत्याही प्रकारची नाराजी ओढावून घेणं भाजपाला परवडणारं नाही. त्यामुळेच नितीश कुमार यांना दिल्लीत उपराष्ट्रपती म्हणून पाठवायचं आणि बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार द्यायचा असा भाजपाचा प्लॅन असल्याची चर्चा आहे. बिहारमध्ये ओबीसी आणि इबीसी मिळून एकूण ६३ टक्के लोकसंख्येवर नितीश कुमारांची पक्कड आहे. त्यामुळेच नितीश कुमारांना उपराष्ट्रपतिपदासारखं सर्वोच्च पद दिल्याने बिहार निवडणुकीत भाजपाला फायदाच होणार आहे . पण हे हि महत्त्वाचं आहे कि बिहारच्या लोकसंख्येत नितीश कुमारांची लोकप्रियता कमी होत चाललीय. नितीश कुमार यांनी अनेक वेळा आपल्या फायद्यासाठी युत्या बदलल्या कधी ‘राजद’सोबत, कधी ‘रालोआ’सोबत त्यांनी युती केली आणि पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यांचे वयही वाढत आहे, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काहीशी सुस्ती आल्याचं ही बोललं जातंय. नितीश कुमार यांना आधीपासून राष्ट्रीय राजकारणाची महत्त्वाकांक्षा आहेच २०१३ मध्ये मोदी यांना भाजपाने पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केल्यानंतर नितीश नाराज झाले होते पुढे त्यांनी एनडीएची साथ सोडत विरोधकांची आघाडी बनवली आणि तिथेही त्यांनी पंतप्रधान बनण्याचे प्रयत्न केले होते पण त्यांना सोयीस्कररीत्या डावलण्यात आलं. त्यांनतर ते पुन्हा एनडीएत सहभागी झाले आता बिहारमध्ये त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागल्याने बिहार सोडून दिल्लीत जाणं हेच नीतीश यांच्यासाठी फायद्याचं आहे असं जाणकार सांगतात
सूरज चव्हाणला वाचवतंय कोण ?
लातूर – गेल्या काही दिवसांत राजकीय क्षेत्रात होतोय तो राडा राडा आणि फक्त राडाच. लातुरात कोकाटेंच्या विरोधात छावा संघटनेकडून तटकरेंना भेटत त्यांच्यासमोर पत्ते फेकण्यात आले. त्यानंतर सुरज चव्हाणांना राग अनावर…








