मुंबई- अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे जणू समिकरणच बनलंय. आता पुन्हा एकदा केतकीने मराठी-हिंदी वादात विनाकारण उडी घेतल्याचं दिसतंय. केतकीने मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलंय. मराठीला अभिजात दर्जा हवाच कशाला? मराठी न बोलल्याने भाषेला भोकं पडतात का? असे प्रश्न तिने व्हिडीओ शेअर करून उपस्थित केलेत.बरं अचानक अशी वादग्रस्त वक्तव्य करण्याचा हेतू काय फक्त प्रसिद्धीसाठी कि आणखी काही.
अभिनेत्री केतकी चितळे हि तिच्या एपिलेप्सीवरील पोस्टमुळे चर्चेत आली.या आजारामुळे तिला मालिकेतून वगळण्यात आल्याचा आरोप तिने केला होता. जुलै २०२० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआमुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मराठी केतकीने फेसबुकवर पोस्ट शेअर करत शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे केतकीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. केतकीने 1 मार्च रोजी युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या निमित्ताने एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये बौद्ध समाजावर टीका केल्याने आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला होता. केतकीविरोधात त्यावेळी अट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी केतकीला 15 मे 2020 रोजी अटक करण्यात आली होती.केतकी चितळेला पोलीस तिच्या कळंबोलीतील घरातून ताब्यात घेऊन नेत असताना तिच्यावर शाई फेकण्यात आली, तसंच अंडीही फेकण्यात आली. शिवाय, कार्यकर्त्यांनी केतकीला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
आता तर राज्यात आधीच हिंदी-मराठी भाषेचा वाद उफाळला असताना आणि मायबोली मराठीच्या अस्तित्वासाठी मराठी माणूस एकवटला असताना, केतकीने मराठीबाबत केलेली ही विधाने अनेकांना चीड आणणारी ठरली आहेत. मराठी भाषेच्या सन्मानासाठी लढणाऱ्या अनेकांना तिच्या या वक्तव्यामुळे मोठा धक्का बसला आहे. तिच्या या वक्तव्याचे काय परिणाम होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल..







