पिंपरी-चिंचवड : पुण्यात गणेश विसर्जनाच्या उत्सवाला हळहळ लावणारी घटना घडली आहे. चाकण परिसरातील वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव आणि बिरदवडी येथे विसर्जनाच्या वेळी चार युवक पाण्यात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यामध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला असून उर्वरित दोन जणांचा शोध सुरू आहे. गणपती बाप्पाला निरोप देताना झालेल्या या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे..








