मुंबई :
चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवसांची प्रतीक्षा आता संपली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नवे नियम लागू केल्यामुळे ४ ऑक्टोबर २०२५ पासून देशभरातील सर्व बँकांमध्ये चेक क्लिअरिंग ‘सेम डे’ म्हणजेच त्याच दिवशी होणार आहे.
नवीन प्रणालीअंतर्गत, ग्राहकांनी दिलेले चेक त्याच दिवशी क्लिअरिंगसाठी पाठवले जातील आणि संबंधित बँकेला संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मंजुरी किंवा नकार द्यावा लागेल. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यातील व्यवहार त्वरित पार पडतील.
बँक ऑफ महाराष्ट्रसह सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना खात्यात पुरेसे पैसे ठेवण्याचा सल्ला दिला आहे. *खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास चेक तत्काळ नाकारला जाईल.
या निर्णयामुळे व्यापार व्यवहार, व्यक्तिगत पेमेंट्स आणि सरकारी देयके अधिक वेगाने पार पडतील. जानेवारी २०२६ पासून या प्रक्रियेला आणखी गती देण्याची RBIची योजना आहे.








