पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदी डॉ. योगिता चौरे यांचा विजय;
आज दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 ची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी डॉ. चौरे योगिता जितेश यांनी विजय मिळवत पिंपळनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे.
नगरपरिषद सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत विविध पक्षांच्या उमेदवारांनी यश संपादन केले असून, निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
भाजपकडून नेरकर योगेश सोमनाथ, डोले मनीषा संभाजी, कोठावदे विनोद मधुकर, महाजन आशा योगेश, पवार माया दीपक, बाविस्कर प्रज्ञा चंद्रशेखर, शिरसाट सतीश बाबुलाल आणि राऊत लिलाबाई सोमनाथ हे उमेदवार विजयी झाले आहेत.
शिवसेनेकडून मालुसरे भिकूबाई वसंत, खान कौसर याकूब, चौधरी प्रशांत पांडुरंग, नेरकर शोभा सुभाष, सोनवणे विशाल सुनील, खैरनार गणेश प्रकाश, ॲड. ज्ञानेश्वर गोविंदराव एखंडे आणि सूर्यवंशी रेखा दिलीप यांनी विजय मिळवला आहे.
अपक्ष उमेदवारांमध्ये डॉ. प्रशांत कांतीलाल बागुल आणि गांगुर्डे विजय साहेबराव यांनी निवडणूक जिंकत नगरपरिषदेत प्रवेश केला आहे.
🔢 संख्याबळ (गणित):
-
नगराध्यक्ष : भाजपा – 01
-
भाजपा : 08 नगरसेवक
-
शिवसेना : 08 नगरसेवक
-
अपक्ष : 02 नगरसेवक
नगरपरिषदेत भाजपा व शिवसेना यांचे समसमान संख्याबळ असून, अपक्ष दोन नगरसेवकांची भूमिका आगामी काळात निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. नगराध्यक्षपदी भाजपा विजयी झाल्याने आगामी नगरपरिषद कारभारात भाजपाचे वर्चस्व राहणार की सत्तास्थापनेसाठी नवे राजकीय समीकरण जुळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. पिंपळनेर शहराच्या विकासासाठी सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरून एकत्रित काम करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.








