सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा चांगलाच वाढला असून दुपारच्या कडक उन्हाने नागरिक अक्षरशः हैराण होत आहेत. मात्र, या प्रचंड उकाड्यामध्येच आता राज्याच्या हवामानात अचानक मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात एकाच वेळी नवीन हवामान प्रणाली सक्रिय होत असल्याने, येत्या २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
२४ ते ४८ तासांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज
मुंबईसह उपनगरांमध्ये मोठा उकाडा वाढला आहे. सध्याचे वातावरण पाहिले तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. हवामान खात्याने या पट्ट्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. पालघरमधील डहाणू येथे पारा ३८.५ अंशांच्या पुढे गेला असून सोलापूर, जळगाव आणि अमरावतीतही उन्हाचा चटका जाणवत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यासह सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागांत पुढील २४ ते ४८ तासांत ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
मुंबईत कसं राहणार हवामान?
भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात मोठे चक्रीवादळ येतंय. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. ज्यामुळे चक्रीवादळ निर्माण झालं आहे. उत्तरेकडे वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. पाच राज्यांवर याचा परिणाम दिसून येईल.२७ ऑक्टोबरपासून विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची चाहूल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर २८ आणि २९ ऑक्टोबरला अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो.कोकण आणि मुंबईत वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याचा अंदाज आहे.
कोकण किनारपट्टीच्या काही भागात पाऊस होण्याचा अंदाज
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे. 150 किमी ताशी वेगाने वारे यादरम्यान वाहण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आज उष्णता वाढण्याची शक्यता आहे.विदर्भात 27 आणि 28 तारखेला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होईल. त्यामुळे 27 तारखेला म्हणजे उद्या राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस होण्याचा अंदाज आहे.
या चक्रीवादळाचा राज्याला थेट धोका नसला तरीही अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, तसा अंदाज आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आज वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.








