
आगामी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा आढावा घेण्यासाठी आज विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह विविध विभागांचे सचिव, रेल्वे, पालिका आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
दादर स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव दिले जाईल
दादर स्थानकाच्या नामकरणाला राज्य सरकारने यापूर्वीच तत्वतः मान्यता देऊन केंद्राला पत्र पाठवले आहे. आता केंद्राच्या मार्गदर्शनानुसार विधिमंडळ अधिवेशनात समितीची प्रक्रिया पूर्ण करून दादर स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत
महापरिनिर्वाण दिनासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये आणि शांततापूर्ण वातावरण राहावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनांना अधिकृतपणे बंदी जाहीर करण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत. यासोबतच, वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे, महापालिका आणि पोलीस यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ऑटोरिक्षांच्या प्रवेशावर मर्यादा घालणे आणि भाविकांच्या पुढील प्रवासाची योग्य सोय करणे, यावर भर देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर ‘चैत्यभूमी’ करण्याची आवश्यक कायदेशीर प्रक्रिया
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या दीर्घकाळाच्या मागणीला अखेर मोठं यश मिळताना दिसत आहे. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर ‘चैत्यभूमी’ करण्याची आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आगामी विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण केली जाईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्य सरकारने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाचे नावे बदलविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यावधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली असून, विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक पूर्तता करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे.
महापरिनिर्वाण दिनासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येतात. दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच मागील वर्षांच्या अनुभवातून निदर्शनास आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
यंदाही प्रत्येक विभागाने सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात.
महापरिनिर्वाण दिनाच्या आयोजनात समन्वय समिती, बौद्ध संघटना आणि विविध संस्थांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनाच्या वतीने आवश्यक व्यवस्थांची जबाबदारी पार पाडण्यात येत असली तरी या उपक्रमाच्या प्रभावी आयोजनासाठी सर्व संबंधित घटकांचा समन्वय आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, प्रशासकीय विभाग तसेच अन्य संबंधित यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत. यंदाही प्रत्येक विभागाने सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात.
चैत्यभूमी नाव देण्याच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच तत्वतः मान्यता
दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने यापूर्वीच तत्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीबाबत केंद्राकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर स्थानकाचे नामकरण करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महापरिनिर्वाण दिन शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यात येईल,
बैठकीत प्राप्त झालेल्या सर्व सूचनांची नोंद घेण्यात आली असून, अनुयायांच्या सुविधा, सुरक्षितता आणि सुव्यवस्थित नियोजनासाठी शक्य त्या सर्व बाबींवर कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा आणि त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस असून, देशभरातून येणाऱ्या अनुयायांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. सर्व विभागांच्या समन्वित प्रयत्नांतून यंदाचा महापरिनिर्वाण दिन शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना त्रास होऊ नये, यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे अथवा आंदोलनांना अधिकृतपणे बंदी जाहीर करण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चैत्यभूमी आणि परिसरात शांततापूर्ण, शिस्तबद्ध व श्रद्धापूर्वक वातावरण कायम राखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.








