मुंबईत गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरु झाली आहे. गणरायाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत मुंबई नुसती गजबजलेली पाहायला मिळेल. मात्र याच गजबजलेल्या गर्दीवर पोलिसांचीही करडी नजर असणार आहे. मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल 15 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहे. तसेच श्वानपथक, बीडीडीएस, 12 एसआरपी कंपनी, क्यूआरटी, 11 हजार सीसीटिव्ही कॅमेऱ्यांद्वारे मुंबईवर करडी नजर ठेवली जाणार आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारेही लक्ष ठेवले जाणार आहे. लालबागच्या राजासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त असणार आहे.
चौपाटीवरही सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. तसेच यासह 450 मोबाइल व्हॅन, 350 बीट मार्शल याचा फिरता पहारा असणार आहे. तसेच गणेशोत्सवा दरम्यान मुंबईत 7 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 36 पोलिस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलिस आयुक्त, 2600 पोलिस अधिकारी आणि 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.










