वडाळाच्या एन.के.ई.एस. हायस्कूलमध्ये “गर्जा महाराष्ट्र माझा” प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : एन.के.ई.एस. हायस्कूलतर्फे “शिका, कमवा आणि खर्च करा (Learn, Earn & Spend)” या संकल्पनेवर आधारित “गर्जा महाराष्ट्र माझा” या अभिनव प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या उपक्रमात इयत्ता ५ ते ९ पर्यंतच्या एकूण ९०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
प्रदर्शनात पाच थीमॅटिक रूम्सची निर्मिती करण्यात आली होती.
• इयत्ता ५: किल्ले, लेणी, मंदिरे
• इयत्ता ६: संस्कृती, दृश्यकला, हस्तकला, पारंपरिक खेळ
• इयत्ता ७: खाद्यसंस्कृती, सण-उत्सव, दागिने
• इयत्ता ८: संत, कवी, लेखक
• इयत्ता ९: जिल्हे, ऐतिहासिक स्थळे, स्मारके, गणितज्ञ व शास्त्रज्ञ
विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे चार्ट्स, मॉडेल्स आणि डेमोद्वारे विषयांचे आकर्षक सादरीकरण केले. प्रत्येक रूमनंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत विद्यार्थ्यांनी कूपन्स कमावले आणि ते फन झोन व फूड झोनमध्ये खर्च करत “कमवा आणि खर्च करा” या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
विशेष आकर्षण ठरला मूव्ही झोन, जिथे विद्यार्थ्यांनी भारतीय मूल्यांवर आधारित लघुपट पाहून प्रश्नमंजुषेत सहभाग घेतला. पुढील दिवशी विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी आणि मराठीत चित्रपट परिक्षण लिहीत बहुभाषिक कौशल्य विकसित केले.
एकूणच, या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, प्रस्तुती कौशल्य, टीमवर्क, आर्थिक जाण व महाराष्ट्राच्या वारशाबद्दल अभिमानाची भावना जागृत झाली. इयत्ता ९ चे विद्यार्थी संपूर्ण प्रदर्शनाच्या व्यवस्थापनात अग्रस्थानी राहून उत्तम नेतृत्व दाखवले.
या अनोख्या उपक्रमामुळे शिक्षण आणि आनंद यांचा सुंदर मेळ घालत एन.के.ई.एस. हायस्कूलने नाविन्यपूर्ण शिक्षणाचा उत्तम नमुना सादर केला.
शुभम पेडामकर










