लोकवर्गणीतून निवडणूक, जनतेसाठी संघर्ष; वॉर्ड 86 मध्ये CPI(M) उमेदवार मैदानात
मुंबई | प्रतिनिधी
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPI-M) ही गेल्या अनेक दशकांपासून कामगार, वंचित व दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारा पक्ष म्हणून ओळखली जाते. याच वैचारिक परंपरेतून शैलेंद्र कांबळे हे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 86 मधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
RTE अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळवून देणे, कामगारांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करणे, तसेच त्यांना त्यांचे कायदेशीर व सामाजिक अधिकार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हेच आपले जीवनकार्य मानून शैलेंद्र कांबळे गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. आर्थिक बळाऐवजी नागरिकांच्या लोकवर्गणीतून ही निवडणूक लढवली जात असून, ही लढत अखेर पैसे जिंकतात की नागरिकांसाठी लढणारे व्यक्तिमत्व जिंकते, हे ठरवणारी ठरणार असल्याची चर्चा परिसरात आहे.
वॉर्ड 86 : 2017 मधील मतदान (अधिकृत निकालानुसार)
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या अधिकृत निकाल पत्रकानुसार 2017 साली वॉर्ड क्रमांक 86 मध्ये खालीलप्रमाणे मतदान झाले होते.
अलमीडा निकोलस (अपक्ष) – 4,070 मते
बैग मस्तान (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) – 172 मते
माया अरविंद डामरेकर (अपक्ष) – 346 मते
प्रगती प्रकाश कदम (भारतीय कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी) – 346 मते
श्रुती खडपे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) – 743 मते
मेनन सुधाकर (अपक्ष) – 198 मते
निकम तुकाराम (शिवसेना) – 4798 मते
पिंटो मेबली (अपक्ष) – 104 मते
सुषमा राय (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – 6,213 मते
हरप्रीतकौर संधू (भारतीय जनता पार्टी) – 5,228 मते
जुली शिंदे (अपक्ष) – 195 मते
NOTA – 350 मते
एकूण मतदार : 38,660
एकूण वैध मते : 22,763
2025 : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPI-M) चे उमेदवार
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत खालील उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
नारायण केशव किडाप्पील – प्रभाग 65
हाजरा शब्बीर आलम शेख – प्रभाग 78
शैलेंद्र एकनाथ कांबळे – प्रभाग 86
सुगंधी फ्रान्सिस – प्रभाग 115
सेजल सुरेश भोपी – प्रभाग 121
हरी गाडगे – प्रभाग 12
संगीता मोहन कांबळे – प्रभाग 143
मायकेल सेल्वन – प्रभाग 185
मनोज यादव – प्रभाग 206
या सर्व उमेदवारांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, स्वच्छता, नागरी सुविधा तसेच कामगार व वंचित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष केला असून, नागरिकांच्या हक्कांसाठी उभे राहणे हाच पक्षाचा मुख्य अजेंडा असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 86 मधील ही निवडणूक ही पैसा आणि सत्ताबळ विरुद्ध नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारा संघर्ष अशी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








