अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

अमरावतीतील एका नामांकित रुग्णलयात महिलांच्या वॉर्डमध्ये भीषण आग लागून त्या अग्नितांडवात ३ नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाल्यीची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्येही अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील एशियन हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. पहाटे पावणे तीनच्या सुमारास हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (NICU) आग लागली. विशेष म्हणजे, त्यावेळी NICUमध्ये तब्बल ९ बाळांवर उपचार सुरू होते. सुदैवाने अग्निशमन दल, पोलीस आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे सर्व बाळांसह रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं.

९ बाळांसह ५५ रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं

मध्यरात्री अडीच वाजता अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत सर्व शिशूंना सुरक्षित बाहेर काढले. तर 55 रुग्णांनाही तातडीने हलवण्यात आले. पुढील उपचारांसाठी या नवजात बालकांना घाटी रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले. या बाक्या प्रसंगात सर्वांच्या समय सूचकतेने मोठा अनर्थ टळला.

या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने रुग्णवाहिका या रुग्णालयासमोर दाखल झाल्या. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिशूंच्या प्रकृतीचे भान राखत त्यांना काळजीपूर्वक इतर रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले. या रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, पोलीस आणि इतर यंत्रणांनी तातडीने बचाव कार्य राबवल्याने अनेकांचे प्राण वाचले.

३० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

बचावकार्याला वेग देण्यासाठी तब्बल ३० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवाहरनगर पोलीस तसेच आरसीपीच्या जवानांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला हातभार लावला. वेळीच मिळालेली आगीची माहिती, अग्निशमन दलाची तत्परता आणि पोलीस, डॉक्टर व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे मोठी दुर्घटना टळली.नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. सर्व 9 शिशू सुरक्षित असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या बालकांवर वैद्यकीय पथकांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

आगीचे नेमकं कारण काय?

ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगीत या विभागाचे नुकसान झाले, त्याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अग्निसुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्याचे आणि आगीच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. अमरावतीमधील सरकारी रुग्णालयातील आगीची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्यानंतर सर्व हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्याची मागणी करण्यात येत आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

    आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वांचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या गणेशोत्सवाचे वातावरण असून मुंबई, पुणे तसेच राज्यभरातील सर्वच गणेश मंडळं कामाला लागली आहेत. पुणे आणि मुंबईचा गणोशोत्सव तर देशभरात चर्चेचा…

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

    पावसाळ्याचे तीन महिने संपत आले असतानाही मराठवाड्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.त्यामुळं भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या असून, चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे…

    Leave a Reply

    You Missed

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

    सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

    सणांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! १ नोव्हेंबरपर्यंत डीजे-डिम, लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी; नियम मोडल्यास होणार थेट कारवाई

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

    पिकांनी माना टाकल्या,शेतकरी हवालदिल! मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे संकट;कृत्रिम पावसासाठी धीरज देशमुखांचे सरकारला साकडे

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    महाराष्ट्रातील माणुसकीचा विजय! ११ महिन्यांच्या हृदयसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचे हात; फक्त ४ दिवसांत तब्बल १० कोटी जमा

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    उपोषणाचा ५ वा दिवस! मनोज जरांगेंचा सरकारला १२ सप्टेंबरचा ‘अल्टीमेटम’; ५ लाख मराठा बांधव मुंबई गाठणार,अंतरवाली सराटीत तणाव

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

    “सच्चा हिंदू बाबराच्या देशात जाऊन पाय चाटेल का?”; मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्यावरून अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

    दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास CBI कडे! मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    तुकाराम मुंढेंचा निर्णय तूर्तास स्थगित!सुट्टे खाद्यतेल विक्रीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांना दिलासा

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक

    मनोरी-गोराई किनारपट्टीवरील कोळीवाडे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र? BMC च्या ‘डीसॅलिनेशन’ प्रकल्पाविरोधात मच्छिमार आक्रमक