५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
दरम्यान मुंबईसह ठाण्यात दहीहंडीचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलं आहे. गोविंदा पथक मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबई, ठाण्यासहित इतर भागातही लाखांचं बक्षीस असलेल्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे विविध शहरात राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
गोविंदा पथकाकडून यंदा नऊ किंवा दहा थर उभारण्याची शक्यता
दहीहंडी सणाला आता एका स्पर्धेचं स्वरुप आलं आहे. गोविंदा पथकाकडून यंदा नऊ किंवा दहा थर उभारण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरापासून गोविंदा पथके दहीहंडीसाठी सराव करत होते. मुंबईसहित ठाण्यातही दहीहंडीचा जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे.आमदार शिवाजीराव पाटील यांनी ठाण्यात दहीहंडीचं भव्यदिव्य आयोजन केलं आहे. त्यांनी या दहीहंडी महोत्सवात तब्बल ७१ लाखांच्या बक्षिसांचं वाटप केलं जाणार आहे. सेलिब्रिटी दहीहंडी अशी विशेष ओळख या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीची आहे. या दहीहंडीत प्रमुख राजकीय नेत्यांसहित सेलिब्रिटी देखील हजर राहण्याची शक्यता आहे.
पाहूयात की मुंबई कुठे आणि किती बिक्षिसे असणाऱ्या दहीहंडी असणार आहेत.
राजन विचारे आयोजित १ लाखांची दहीहंडी
मुंबई- ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह ठेवण्यात आलं आहे. जांभळी नाका परिसरात दरवर्षीप्रमाणे ही दहीहंडी होईल सेलिब्रिटी त्यासोबत मराठी कलाकार या दहीहंडीला उपस्थिती लावतात.
ठाण्यात टेंभी नाका ते आमदार प्रताप सरनाईक यांच्या युवा प्रतिष्ठानची दहीहंडी, २१ लाख ते ५१ लाखांपर्यंतच्या बक्षिस
‘सेलिब्रिटी हंडी’नंतर ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी देखील मानाची मानली जाते. मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंड्या ठेवण्यात आल्या असून, विजेत्या पथकांना प्रत्येकी 1 लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. महिलांच्या गोविंदा पथकासाठीही १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांनीही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे दहीहंडीचं आयोजन केलं आहे. त्यांच्या दहीहंडीतून २१ लाख ते ५१ लाखांपर्यंतच्या बक्षिसांचं वाटप केलं जाणार आहे. ठाण्यातील आमदार रविंद्र फाटक यांनीही दहीहंडीचं आयोजन केलं आहे. त्यांनी दहीहंडीसाठी २१ लाख रुपयांची घोषणा केली. तर दिघे यांच्या समर्थकांनी टेंभी नाका येथे दहीहंडीचं आयोजन केलं आहे.
आयोजकांकडून दहीहंडी उत्सवात ११ लाख ते २५ लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. अविनाश जाधव यांच्या नौपाडा येथेही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. नौपाड्यात ११ लाख ते २१ लाखांपर्यंत रुपयांची बक्षिसांचं वाटप केलं जाईल.
२१ लाखांच्या या दहीहंडीला ‘हास्य जत्रा’ च्या कलाकारांचीही उपस्थिती
शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्याकडून ठाण्यात दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दहीहंडी उत्सवाचे आयोजन विश्वविक्रमाचा ‘संकल्प’ ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आलं आहे. यावेळी ‘हास्य जत्रा’ च्या कलाकारांचीही उपस्थिती राहणार आहे.
घाटकोपरमध्ये मनसेची ५१ लाखांची हंडी
मुंबईच्या घाटकोपरमध्येही मनसेच्या गणेश चुक्कल यांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. त्यांनी दहीहंडी फोडण्याऱ्यांसाठी 51 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. मनसेच्या या दहीहंडीला सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. घाटकोपरसहित वरळी, दादर, बोरिवली, चेंबूरमध्ये भव्यदिव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाण्यात पोलिसांनी २५४ दहीहंडी आयोजनाला परवानगी दिली आहे.
दादरच्या आयडियलच्या गल्लीत सेलिब्रिटी दहीहंडी
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दादरच्या आयडियल च्या गल्लीमध्ये सेलिब्रिटी दहीहंडी आणि महिला गोविंदा पथकाकडून दहीहंडी फोडली जाईल सकाळी आठ वाजल्यापासून इथे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो मराठी सेलिब्रिटी सुद्धा उपस्थित राहतील.
दहिसर पूर्व खास दहीहंडी
दहिसर पूर्व येथे शिवसेना आयोजित यशोधन फांऊडेशन तर्फे दहिकाला महोत्सव खास आकर्षण ठरणार आहे. यावेळी स्वप्निल बांदोडकर- गायक, हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने, नम्रता संभेराव देखील असणार आहेत.
मिरा-भाईंदर तब्बल ३१ लाखांची दहीहंडी
मिरा-भाईंदर येथे प्रताप फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात यंदा प्रथम पारितोषिक तब्बल ३१ लाख रुपयांची दहीहंडी असणार आहे. मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांच्या उत्साहाला आणि गोविंदा पथकांच्या क्रीडाप्रतिभेला व्यासपीठ मिळावे, यासाठी शिवसेना मीरा भाईंदर प्रताप फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत, सेंटर प्लाझा हॉल सर्कल, शांती पार्क, मिरा रोड पूर्व येथे हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.








