
वसई (पालघर) | 5 जून 2025 – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था, पालघर जिल्हा व वसई तालुक्याच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त म्हाडा कॉलनी, वसई येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन तालुका संघटक आदरणीय श्री. रणजीत माने यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य सचिव श्री. बापू परब, कोकण विभाग अध्यक्ष श्री. शिवाजी पाटील सर, वसई तालुका संघटक भाग्यश्री परब, तसेच मॉर्निंग वॉक ग्रुपचे पर्यावरणप्रेमी महिला व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पर्यावरण दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देत, श्री. माने यांनी आवाहन केले की – “प्रत्येकाने आपल्या राहत्या घरासमोर, सोसायटीत एक झाड नक्की लावावे व आमच्या संस्थेला एक झाड डोनेट करावे. एक झाड आईसाठी, वडिलांसाठी, भावासाठी, बहिणीसाठी, देशासाठी, राज्यासाठी, जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी द्यावे.”
त्याचप्रमाणे, आपल्या परिसरात झाडे लावण्यासाठी जागा असेल तर ती आधीपासून निश्चित करून संस्थेला कळवावी, जेणेकरून संबंधित ठिकाणी वृक्षारोपण करता येईल, असेही त्यांनी सुचवले.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे केल्याबद्दल आदरणीय श्री. रणजीत माने सर यांचे उपस्थित सर्व पर्यावरणप्रेमींनी अभिनंदन केले व आभार मानले.