दक्षिण अमेरिकेतील ड्रेक पॅसेजमध्ये भूकंप झाला. सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नंतर यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने त्याची तीव्रता ७.५ इतकी मोजली. हा भूकंपड्रेक पॅसेजमध्ये १० किमी खोलीवर झालाय. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला आहे.ड्रेक पॅसेज परिसरात मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले गेले.
ड्रेक पॅसेज हा एक खोल आणि रुंद सागरी मार्ग आहे, जो नैऋत्य अटलांटिक महासागर आणि आग्नेय प्रशांत महासागराला जोडतो. यूएसजीएसच्या आकडेवारीनुसार, भूकंपाची नोंद १०.८ किलोमीटर खोलीवर झाली. यापूर्वी मे २०२५ मध्येही या भागात ७.५ तीव्रतेचा भूकंप झाला होता. अमेरिकेच्या राष्ट्रीय त्सुनामी केंद्राने प्यूर्टो रिको-व्हर्जिन बेटांवर त्सुनामीचा इशारा दिला आहे.







