जरांगेंची मुंबईकडे कूच, पत्नी-मुलांना अश्रू अनावर

मराठ्यांना आरक्षण मिळावं. यासाठी जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी काही अटी-शर्तींसह जरांगे पाटील यांना उपोषण करण्यास परवानगी दिली आहे. तत्पूर्वी अंतरवाली सराटीहून मुंबईकडे हजारो मराठ्यांसह मनोज जरांगे शेकडो वाहनांसह निघाले असून महाकाळा अंकुशनगर येथे कुटुंबियांकडून मनोज जरांगे यांचं औक्षण करण्यात आलं. दरम्यान मनोज जरांगे यांच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मुलगा शिवराज याने त्यांना दोन कवड्याच्या माळा घातल्या. यावेळी जरांगे पाटील यांच्या डोळ्यातही अश्रू तरळले. त्यांनी मुलांची समजूत काढली.
एकीकडे जरांगे मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका करत आहेत.तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदेंनी मौन बाळगलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरे गावाला जाण्याचा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदेंना पुढे केले जाणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

  • Related Posts

    भाजपेयी जरांगेंवर तुटून पडले, कारण काय ?

    मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे 27 ऑगस्टला मुंबईकडे आंदोलनासाठी निघणार आहेत. जरांगे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका करतानाही दिसतात. मात्र…

    जगदीप धनखड आहेत कुठे?

    मुंबई- सर्वत्र एकच चर्चा आहे ती म्हणजे जगदीप धनखड आहेत कुठे? देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड २१ जुलैला तब्येतीचं कारण देत अचानक पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित…

    Leave a Reply

    You Missed

    जरांगेंची मुंबईकडे कूच, पत्नी-मुलांना अश्रू अनावर

    जरांगेंची मुंबईकडे कूच, पत्नी-मुलांना अश्रू अनावर

    गौतमने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला ?

    गौतमने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला ?

    भाजपेयी जरांगेंवर तुटून पडले, कारण काय ?

    भाजपेयी जरांगेंवर तुटून पडले, कारण काय ?

    गणेशोत्सवात मुंबई पोलीस ऑन ड्युटी

    गणेशोत्सवात मुंबई पोलीस ऑन ड्युटी

    गेवराईत हाकेंच्या गाडीवर दगडफेक

    गेवराईत हाकेंच्या गाडीवर दगडफेक

    राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवाचं निमंत्रण

    राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना गणेशोत्सवाचं निमंत्रण

    शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक…

    शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस आक्रमक…

    लालबाग राजाच्या देखाव्यात हत्तीचा मुखवटा…….

    लालबाग राजाच्या देखाव्यात हत्तीचा मुखवटा…….

    कोकणवासीयांचे हाल संपेना

    कोकणवासीयांचे हाल संपेना