छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

छत्रपती संभाजीनगर येथे बीपीसी मुख्यालयातील टपाल कर्मचाऱ्यांवर काहींनी कार्यालयात घुसून त्यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी टपाल कर्मचारी संघटनेने केली आहे.

कार्यालयात धुडगूस आणि शिवीगाळ

मिळालेल्या माहितीनुसार, बीपीसी मॅनेजर भरत गुंजेवटे आणि अनिल वारोडे हे कार्यालयात कार्यरत असताना, रोजंदारीवर कामावर असलेल्या दोन महिलांनी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना सोबत आणून कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि शासकीय कामकाजात मोठा अडथळा निर्माण केला.

रस्त्यात अडवून अमानुष मारहाण

घटना एवढ्यावरच थांबली नाही. कामकाज संपवून घरी परतत असताना भरत गुंजेवटे यांना रस्त्यात अडवण्यात आले. गुंजेवटे हे दोन्ही पायांनी दिव्यांग असतानाही, त्यांना वाहनातून बाहेर ओढून मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना वाचवण्यासाठी मदतीला धावलेले सहकारी रंजीत पाटील यांनाही गुंडांनी लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात रंजीत पाटील जखमी झाले आहेत.

पोलीस ठाण्यात रात्रभर ठिय्या; संघटनेचा इशारा

या घटनेची माहिती मिळताच टपाल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी आक्रमक झाले. दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यरात्री पावणेदोन वाजेपर्यंत सिटी चौक पोलीस ठाण्यात उपस्थित राहून प्रशासनाकडे दाद मागितली.

शासकीय कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर दादागिरी करणे आणि दिव्यांग कर्मचाऱ्याला रस्त्यात अडवून मारहाण करणे अत्यंत निंदनीय आहे. टपाल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    शिक्षक दिनानिमित्त देशभरातली ८२ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवडण्यात आलं आलं होतं. त्यात महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या या…

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    राज्यभरात मॉन्सूनचे प्रवाह मंदावले असल्यामुळे अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात…

    Leave a Reply

    You Missed

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    छत्रपती संभाजीनगर येथे टपाल कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांवर हल्ला; दिव्यांगासह सहकाऱ्याला मारहाण, तीव्र निषेध!

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    महाराष्ट्राच्या ‘या’ ९ शिक्षकांचा देशभरात डंका! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार हजेरी!वातावरणात गारवा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन,तर मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    दहीहंडी उत्साहाला गालबोट! मुंबईत पहिली दुर्घटना, तर 32 गोविंदा जखमी, एका महिलेचा मृत्यू

    विकासकामांच्या नावावर आमदारांचा निधीवर डल्ला! ३५ ते ४० % कमिशन मागताना भाजप अन् सपाचे आमदार कॅमेऱ्यात कैद,स्टिंग ऑपरेशन

    विकासकामांच्या नावावर आमदारांचा निधीवर डल्ला! ३५ ते ४० % कमिशन मागताना भाजप अन् सपाचे आमदार कॅमेऱ्यात कैद,स्टिंग ऑपरेशन

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी; कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    राज्यभरात दहीहंडीचा उत्साह! मुंबई, ठाण्यात २५ ते ७१ लाखांच्या दहीहंडी;  कुठे-कुठे अन् किती लाखांच्या दहीहंडी पाहुयात

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

    आरे मेट्रो स्टेशनखाली स्लीपर कोच बसला भीषण आग! महामार्गावर धुराचे लोट; प्रचंड वाहतूक कोंडी

    विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

    विमान पार्किंग करताना चूक! नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगो विमानाचा अपघात, पार्किंग पोलला धडक; सर्व प्रवासी, क्रू मेंबर्सची अवस्था काय?

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण

    अमरावतीच्या दुर्घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर हादरले! एशियन हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, ९ नवजात बाळांसह होते ५८ रुग्ण