हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार व्यक्तिमत्त्व, अभिनयातील नटसम्राट नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत.वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालं.पुण्याच्या जवळ असलेल्या डोणजे गावातील त्यांच्या ‘नानाची वाडी’ या फार्महाऊसजवळ 8 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला. आपल्या दमदार अभिनयानं लोकांची मनं जिंकणाऱ्या नानांचं अंतिम दर्शन घेता न आल्यानं अनेक चाहते आणि कलाकारांना त्यांना श्रद्धांजली वाहण्याची संधी मिळाली नाही.
पाटेकर कुटुंबीयांनी मात्र, नानांचे अंत्यविधी रात्री उशीराच उरकले?
नाना पाटेकरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल, अशी अपेक्षा लोकांना होती, पण कुटुंबीयांनी त्याच रात्री उशिरा अंत्यविधी उरकून घेतलेेे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात त्यांच्या लाडक्या अभिनेत्याचं अंत्यदर्शन घेण्याची इच्छा अपूर्णच राहिल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अंत्यसंस्कार एवढ्या राञी उशीरा का करण्यात आले असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. कारण सामान्यतः हिंदू परंपरेनुसार, सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार टाळले जातात, तरीही पाटेकर कुटुंबीयांनी मात्र, नानांचे अंत्यविधी रात्री उशीराच उरकले, पण असं का केलं? नानांचं पार्थिव अंत्यविधीसाठी का ठेवलं नाही? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत.
नानांच्या थोरल्या मुलानं सांगितलं मोठं कारण
दरम्यान कुटुंबानं अंत्यसंस्कारासाठी रात्रीची इतकी उशिराची वेळ का निवडली? याबाबत माध्यमांशी बोलताना याबाबत नाना पाटेकरांचा लेक मल्हार पाटेकर यानं रात्रीच अंत्यविधी उरकण्याच्या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं आहे. वडिलांना अखेरचा निरोप देताना मल्हार अत्यंत भावूक झालेला दिसला.नाना पाटेकरांच्या पार्थीवावर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्याच्या निर्णयाबाबत बोलताना मल्हारनं सांगितलं की, “आम्ही गोव्याला होतो आणि आम्हाला त्यांचं पार्थिव गावातील फार्महाऊसवर आणायचं होतं… आम्ही लवकर पोहोचू असं वाटलं होतं, पण अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला… त्यांचं निधन पहाटेच झालं होतं आणि बराच वेळ उलटून गेला होता… पार्थिव जास्त वेळ तसंच ठेवणं योग्य नव्हतं… म्हणूनच आम्हाला सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करावे लागले”
#WATCH | Pune, Maharashtra: On the demise of his father and veteran actor Nana Patekar, Malhar Patekar says, “A person like Nana Saheb never truly leaves us; his achievements have made him immortal. Secondly, he always believed that everyone should come together and follow a righteous path on a global scale… Thirdly, regarding the future—carrying forward the vision Nana Saheb left behind is how we will shape the life ahead. Regarding the Marathwada tour… Nana had recently spoken about it; the work related to it was about to begin… When I met him, we discussed this matter… Given the massive scale at which the NAAM Foundation operates. The CM also felt that if we work together, we would be able to achieve the target…”
He further says, “We proceeded (with the last rites today) because the tragedy occurred early this morning, so a significant amount of time had already passed. That is why we decided to go ahead with it today.
— ANI (@ANI) October 8, 2026
नानांचे सर्व विधी मंत्रोच्चारांमध्ये संपन्न
8 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा नाना पाटेकर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले, हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्याचं पार्थिव पंचतत्त्वात विलीन झालं. नानांचा थोरला लेक मल्हार पाटेकर यानं अत्यंत जड अंतःकरणानं अंत्यविधीची सर्व कर्तव्य पार पाडली आणि वडिलांच्या चरणांना स्पर्श करून त्यांना अखेरचा निरोप दिला. मंत्रोच्चारांमध्ये हे सर्व विधी संपन्न झाले.
#WATCH | Maharashtra: Last rites of veteran actor Nana Patekar performed with state honours at his native village, Donje village in Pune Rural. He passed away in Goa today. https://t.co/sh2DtLvT4g
— ANI (@ANI) October 8, 2026
अखेरचा निरोप देताना पत्नी नीलाकांती कोलमडल्या
विधीवेळी नाना यांच्या पत्नी नीलाकांती पुरत्या कोलमडल्या होत्या.नाना पाटेकरांना अखेरचा निरोप देताना पत्नी नीलाकांती भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 35 वर्षांपासून नाना पाटेकर यांच्यापासून वेगळ्या राहत होत्या नीलाकांती पाटेकर. तरीही त्यांनी कधीही घटस्फोट घेतला नाही. माञ नानांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्या भावूक झाल्याचं दिसून आलं. पतीचा निरोप घेताना त्या भावूक होऊन रडू लागल्या आणि तिथे उपस्थित असलेल्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये नीलाकांती अंत्यविधीची प्रक्रिया करताना दिसत आहेत. नानांना त्यांची पत्नी आणि मोठ्या लेकानं मुखाग्नी दिला.








