शिक्षण हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक पवित्र कार्य आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर समर्पित राहून माणसातल्या देवत्वाचा खरा अर्थ जगणारे आदरणीय शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुकयातील किनी यल्लादेवी गावात विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. अजय कौल यांना माणसातला देव शोधणारे आणि घडवणारे व्यक्तिमत्त्व म्हटलं जातं.
‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून विशेष योगदान
‘जागृत महाराष्ट्र न्यूज’चे मुख्य संपादक अमोल भालेराव यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली त्यांच्या लाडक्या गुरुवर्यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील किनी यल्लादेवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य वृक्षारोपण करण्यात आले, तसेच एका गरजू आणि होतकरू विद्यार्थ्याला अभ्यासाच्या प्रवासात मदत व्हावी म्हणून मोफत सायकल वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला जागृत महाराष्ट्र न्यूजचे लातूर जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाणे यांची देखील तेवढीच मोलाची साथ या कार्यक्रमाला लाभली आहे.
गरजू विद्यार्थ्याना सायकलचे वाटप
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेकदा शाळेत येण्या-जाण्यासाठी वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागतो. हीच अडचण ओळखून, अजय कौल सरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गरजू विद्यार्थ्याना सायकलचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्याच्या आणि त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश, शाळेच्या आवारात वृक्षारोपण
एवढंच नाही तर किनी यल्लादेवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले.यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना वृक्षांचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व असते हे देखील समजण्यास मदत झाली.
जागृत महाराष्ट्र न्यूजच्या टीमचे व मुख्य संपादक अमोल भालेराव यांचे विशेष कौतुक व आभार
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक अमोल भालेराव यांच्यासोबतच लातूर जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाणे यांनी विशेष मेहनत घेतली व मोलाचे योगदान दिले. या सामाजिक उपक्रमाबद्दल किनी यल्लादेवी गावातील ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक तसेच परिसरातून जागृत महाराष्ट्र न्यूजच्या टीमचे व मुख्य संपादक अमोल भालेराव यांचे विशेष कौतुक व आभार व्यक्त केले जात आहेत.








