त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जाताय? मग ही बातमी आधी वाचा; ‘या’ तारखेपर्यंत VIP प्रवेशावर बंदी!

नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर त्याआधी ही माहिती असणे फार महत्त्वाचे आहे. त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी वाढत असते. त्याच पार्श्वभूमीवर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने VIP दर्शनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिरातील सर्व प्रकारची VIP दर्शन सुविधा १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

3 ते 12 ऑक्टोबरपर्यंत VIP दर्शन बंद

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबरपासूनच हा निर्णय लागू करण्यात आला आहे. ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मंदिरातील VIP दर्शन व्यवस्था बंद राहणार आहे. पितृपक्षाच्या काळात त्र्यंबकेश्वरमध्ये देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. कारण पितृपक्षात त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधी आणि दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत असते. त्यामुळे मंदिरातील सर्वसामान्य दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी VIP दर्शन तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

VIP entry is banned until October 12
VIP entry is banned until October 12

गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी निर्णय

पितृपक्ष हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा काळ मानला जातो. या कालावधीत पूर्वजांच्या स्मरणार्थ विविध धार्मिक विधी करण्यासाठी भाविक त्र्यंबकेश्वरला येतात. त्यामुळे मंदिर परिसर तसेच शहरातील विविध भागांत भाविकांची वर्दळ असते. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सर्व भाविकांना शक्य तितक्या सुरळीतपणे दर्शन घेता यावं यासाठी देवस्थान ट्रस्टकडून नियोजन करण्यात येत आहे. म्हणून VIP दर्शन सुविधा बंद ठेवण्यात आली आहे.  त्यामुळे सर्व भाविकांना समान आणि सुरळीत दर्शनाचा अनुभव मिळावा, तसेच मंदिरातील गर्दीचे योग्य व्यवस्थापन करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

भाविकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने सर्व भाविकांना VIP दर्शन बंद ठेवण्याच्या निर्णयाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मंदिर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.त्यामुळे ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्याचा विचार करणाऱ्या भाविकांनी दर्शनाचे नियोजन करताना ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. विशेषतः VIP दर्शनाची अपेक्षा असलेल्या भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असही मंदीर ट्रस्टने सांगितलं आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य दर्शन व्यवस्था अधिक सुरळीत ठेवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा! ज्ञानेश कुरामांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त एल्गार;हजारो कार्यकर्ते आणि तरुणांची गर्दी

    अगदीच थोड्याच वेळातशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ची सुरुवात होणार आहे. मोर्चा…

    “सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच,हिंदू-मुस्लिम राजकारण,मग मोदी आमचे मिञ कसे?” शिवाजी पार्कमधील Gen Z तरुणीचा संताप; व्हिडिओ व्हायरल

    मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर २ ऑक्टोबरच्या दिवशी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ च्या वतीने आयोजित आंदोलनात तरुणांचा प्रचंड मोठा जनसागर पाहायला मिळाला. या…

    Leave a Reply

    You Missed

    त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जाताय? मग ही बातमी आधी वाचा; ‘या’ तारखेपर्यंत VIP प्रवेशावर बंदी!

    त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जाताय? मग ही बातमी आधी वाचा; ‘या’ तारखेपर्यंत VIP प्रवेशावर बंदी!

    थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा! ज्ञानेश कुरामांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त एल्गार;हजारो कार्यकर्ते आणि तरुणांची गर्दी

    थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा! ज्ञानेश कुरामांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे बंधूंचा संयुक्त एल्गार;हजारो कार्यकर्ते आणि तरुणांची गर्दी

    “सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच,हिंदू-मुस्लिम राजकारण,मग मोदी आमचे मिञ कसे?” शिवाजी पार्कमधील Gen Z तरुणीचा संताप; व्हिडिओ व्हायरल

    “सगळीकडे फक्त भ्रष्टाचारच,हिंदू-मुस्लिम राजकारण,मग मोदी आमचे मिञ कसे?” शिवाजी पार्कमधील Gen Z तरुणीचा संताप; व्हिडिओ व्हायरल

    पाकिस्तानला हरवत भारताचा Asian Games क्रिकेटमध्ये सलग दुसरा Gold;अभिषेक-तिलकचे वादळ अन् भारतीय गोलंदाजांची धार

    पाकिस्तानला हरवत भारताचा Asian Games क्रिकेटमध्ये सलग दुसरा Gold;अभिषेक-तिलकचे वादळ अन् भारतीय गोलंदाजांची धार

    ३५० तरुणांची लग्ने खोळंबली! पाणी ८०० मीटर अंतरावर असूनही गाव कोरडंच; अखेर गावकऱ्यांनी थेट गावचं विकायला काढलं,माढा तालुक्यातील तुळशी गावाची विदारक वास्तव

    ३५० तरुणांची लग्ने खोळंबली! पाणी ८०० मीटर अंतरावर असूनही गाव कोरडंच; अखेर गावकऱ्यांनी थेट गावचं विकायला काढलं,माढा तालुक्यातील तुळशी गावाची विदारक वास्तव

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    शिवाजी पार्कबाहेरील CJP च्या आंदोलनात बॉलिवूडस्टार नसीरुद्दीन शाह; सर्वांनाच बसला धक्का,अभिजित दीपके थेट पाया पडला

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    मुंबई ते दिल्ली तणाव वाढला! संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्कात CJP चे आंदोलन; तर जंतर मंतरवर पोलिस बंदोबस्त, 11 मेट्रो स्थानके बंद

    महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

    महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा! पावसाची उघडीप अन् उन्हाचे चटके; मुंबईकरांची उकाड्याने लाहीलाही

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून

    मुंबईकरांना नवा भुर्दंड! मुंबईत प्रवेश करणे महागलं, टोल दरात वाढ; 55 उड्डाणपूलाचा खर्च मुंबईकरांच्या खिशातून