मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…! विवेकानंद पाटीलचे घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी; घर बांधून देण्याची ऑफर, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या म्हणाला, “मला माझ्या…”

पुण्यात MPSCचं आंदोलन सुरु आंदोलन गाजवलं ते म्हणजे कोल्हापूरचा विवेकानंद पाटीलने. विवेकानंदने आपल्या भाषणामुळे आंदोलन तर गाजवलं पण सोबतच त्याच्या मिश्कील भाषणामुळे सोशल मीडियावर त्याचा चाहता वर्ग वाढत चालला आहे. त्याच्या भाषणाचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. पण आता त्याच्या या भाषणाचे चक्क नेतेही चाहते झालेत.

विवेकानंदचं घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी

आपल्या दमदार भाषणाने ज्वलंत प्रश्न चव्हाट्यावर आणणारा विवेकानंद पाटीलची अभ्यासपूर्ण मांडणी, रांगडी भाषा आणि परखड मताची एका नेत्याला खरोखरच भूरळ पडली. पण जेव्हा त्यांनी त्याचे घर पाहिले तेव्हा माञ त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणजे काँग्रेस नेते विश्वजीत कदम

“मला माझ्या परिस्थितीचं भांडवल करायचं नाही”

दरम्यान, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी विवेकानंदच्या घराचा उल्लेख करत, त्याची परवानगी असेल तर त्याच्या आई-वडिलांसाठी चांगले घर बांधण्याची जबाबदारी आपण घेऊ, अशी भूमिका मांडली होती. मात्र विवेकानंद पाटीलने ही मदत नम्रपणे नाकारली. “मला माझ्या परिस्थितीचं भांडवल करायचं नाही,” अशी भूमिका त्याने घेतली. विश्वजीत कदम यांच्या प्रस्तावाबद्दल आभार व्यक्त करताना, घर आज नाही तर उद्या आपण स्वतः बांधू शकतो, असेही त्याने स्पष्ट केले.

मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…

आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना आंदोलनात खेळवून ठेवणारा विवेकानंद पाटील हा मूळचा राधानगरी तालुक्यातील माजगाव या छोट्याशा गावातला तरुण आहे. शेती करणारे आई वडील, छोटसं पत्र्याचे घर. मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन आणि त्यात पुस्तके असे अतिशय छोटे विवेकानंदचे घर आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धेतून मिळालेल्या बक्षिसाची मांडणी असं विवेकानंदच्या घरातील दृश आहे. हे दृश्य पाहून विश्वजीत कदम हे भावूक झाले आहेत. त्यांनी थेट विवेकानंदला घर बांधून देणार असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले विश्वजीत कदम?

विश्वजीत कदम म्हणाले की, विवेकानंद पाटीलला मी घर बांधून देणारच. त्याच्यासाठी नाही निदान त्याच्या आई वडिलांसाठी. तो प्रसिद्ध झाला म्हणून हे मी करत नाही. त्याचं घर पाहून मी भावनिक झालो. माझे वडील पण अशाच घरात राहायचे. वडील सांगायचे आठवड्यातून एक दिवस घरी अंड खायला भेटायचं. मी भावनिकतेतून म्हटल की घर बांधून देतो.

पुढे मुख्यमंत्र्यांना विनंती करत विश्वजीत कदम म्हणाले की, एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवला जावा अशी आमची मागणी आहे. विद्यार्थ्यांची दखल घ्यायला सरकार तयार नाही. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की त्यांनी हा प्रश्न सोडवावा.

कोण आहे विवेकानंद पाटील?

आपल्या खास कोल्हापूरी लकबीत, रांगड्या शैलीत अस्सल कोल्हापुरी स्वॅगने अवघ्या काही काळातच विवेकानंद पाटील हा एमपीएससी आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. त्याचा दमदार भाषणाने राज्याचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर त्याचा जणू स्वॅग सुरू आहे. २४ वर्षांचा विवेकानंद पाटील पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    माणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटप

    शिक्षण हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक पवित्र कार्य आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर समर्पित राहून माणसातल्या देवत्वाचा खरा अर्थ जगणारे आदरणीय शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य…

    “तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी

    पुण्यातील एम.पी.एस.सी. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांना आंदोलनाबाबत बरेच सल्लेही दिले. सोबतच मी इथे भाषण करायला…

    Leave a Reply

    You Missed

    माणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटप

    माणसातला देव घडवणारे व्यक्तिमत्त्व! शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये सामाजिक उपक्रम; ‘जागृत महाराष्ट्र न्यूज’कडून वृक्षारोपण अन् विद्यार्थ्यांना सायकल वाटप

    मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…! विवेकानंद पाटीलचे घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी; घर बांधून देण्याची ऑफर, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या म्हणाला, “मला माझ्या…”

    मातीने सारवलेल्या भींती, शेणाची जमीन…! विवेकानंद पाटीलचे घर पाहून नेत्याच्या डोळ्यात पाणी; घर बांधून देण्याची ऑफर, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या म्हणाला, “मला माझ्या…”

    “तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी

    “तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?”; राज ठाकरेंनी आंदोलनात घेतली विवेकानंद पाटीलची तुफान फिरकी

    “उपोषण हा मार्ग नाही…”! पुण्यात MPSC आंदोलकांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला; शिवतीर्थावर विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंञण

    “उपोषण हा मार्ग नाही…”! पुण्यात MPSC आंदोलकांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला; शिवतीर्थावर विद्यार्थ्यांना चर्चेसाठी आमंञण

    कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंचा उल्लेख; नाव ऐकताच अजय देवगणने चेहरा लपवला, अजयची रिॲक्शन तुफान व्हायरल

    कपिल शर्माच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंचा उल्लेख; नाव ऐकताच अजय देवगणने चेहरा लपवला, अजयची रिॲक्शन तुफान व्हायरल

    शिवाजी पार्कातील ‘जेल भरो’ आंदोलन CJPला भोवलं; अभिजीत दिपकेंसह ५०० जणांवर FIR दाखल,थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

    शिवाजी पार्कातील ‘जेल भरो’ आंदोलन CJPला भोवलं; अभिजीत दिपकेंसह ५०० जणांवर FIR दाखल,थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

    काय सांगता! महाराष्ट्रात जनतेतून थेट सरपंच निवड रद्द? तुम्ही सरपंचपदाची निवडणूक लढवणार असाल तर, हे २ मोठे बदल जाणून घ्या

    काय सांगता! महाराष्ट्रात जनतेतून थेट सरपंच निवड रद्द? तुम्ही सरपंचपदाची निवडणूक लढवणार असाल तर, हे २ मोठे बदल जाणून घ्या

    “सरकार मदत करतंय की चेष्टा?” ३२ हजार कोटींच्या कर्जमाफीचा फुगवटा; शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त ९४० रुपये,बळीराजाची उघड-उघड फसवणूक

    “सरकार मदत करतंय की चेष्टा?” ३२ हजार कोटींच्या कर्जमाफीचा फुगवटा; शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त ९४० रुपये,बळीराजाची उघड-उघड फसवणूक

    त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जाताय? मग ही बातमी आधी वाचा; ‘या’ तारखेपर्यंत VIP प्रवेशावर बंदी!

    त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जाताय? मग ही बातमी आधी वाचा; ‘या’ तारखेपर्यंत VIP प्रवेशावर बंदी!