पुण्यातील एम.पी.एस.सी. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांना आंदोलनाबाबत बरेच सल्लेही दिले. सोबतच मी इथे भाषण करायला आलेलो नाही तर तुमच्या रागात सामील व्हायला आलो आहे असं म्हणत त्यांनी तरूणांना पाठिंबाही दर्शवला.
राज ठाकरेंनी विवेकानंदची घेतलेली फिरकी
यावेळी राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद तर माध्यमांवर व्हायरल झाल पण सोबतच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झासा तो म्हणजे राज ठाकरेंनी विवेकानंदची घेतलेली फिरकी. हा तोच कोल्हापूरचा विवेकानंद पाटील ज्याच्या मिश्किल शैलीतील भाषणाने पुण्याचे आंदोलन जास्तच चर्चेत आलं.
राज ठाकरेंच्या समोर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक शैलीत भाषण
विवेकानंद पाटील याने राज ठाकरेंच्या समोर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक शैलीत भाषण करत विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या.राज ठाकरे यांच्यासमोर बोलताना विवेकानंद पाटील म्हणाला “पक्ष फुटले, आमदार-खासदार फुटले तेव्हा काही वाटलं नाही, पण MPSC चा पेपर फुटला आणि आमचं आभाळ फाटलं” असं म्हणत आपल्या शैलीत जोरदार भाषण ठोकलं.
“तुम्ही तेच तेच भाषण करता का?”
राज ठाकरे यांनी विवेकानंदचे कौतुकही केलं. पण त्यानंतर राज ठाकरेंनी त्याची चांगलीच फिरकी घेतली. त्याच्या या धडाकेबाज आणि ओघवत्या भाषणानंतर राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या मिश्कील आणि हजरजबाबी शैलीत त्याला “मी बरीच भाषण ऐकली, तुम्ही रोज तेच तेच भाषण करता का?” असा गंमतीशीर टोला लगावला. राज ठाकरेंच्या या मिश्कील टिप्पणीमुळे आंदोलनस्थळी एकच हशा पिकला.
राज ठाकरेंनी काढलेला हा चिमटा नक्कीच नकारात्मक नव्हता
राज ठाकरेंनी काढलेला हा चिमटा नक्कीच नकारात्मक नसून त्यांच्या नेहमीच्या शैलीतला गंमतीशीरच होता. कारण विद्यार्थ्यांचा राग योग्य असल्याचं सांगत त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे आश्वासन राज ठाकरेंनी दिले.आंदोलकांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, “गेले काही दिवस मी पाहतोय, या आंदोलनाच्या ठिकाणी अनेकजण येत आहेत आणि पाठिंबा देत असल्याचं सांगत आहेत. पण मी आज जो आलोय तो फक्त तुमच्या रागात सामील व्हायला आलोय. आज तुम्हाला आलेला राग हा तात्पुरता असू नये. सरकारी फसवणुकीमुळे आपल्या आयुष्याचा उमेदीचा काळ कसा जातोय हे माझ्यापेक्षा कुणी चांगलं सांगू शकत नाही. तुमच्याकडे पेपर फुटत आहेत, आमच्याकडे मतं फुटत आहेत. परंतु या सगळ्या गोष्टींमुळे एकेक वर्ष निघून जातं. आमच्याही आयुष्यातील वर्ष निघून जातंय. पण त्याचा राग काय असतो हे माझ्यासोबत तुम्हालाही समजत आहे.”
पण आंदोलनस्थळावरील विवेकानंद पाटीलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर माञ चांगलाच व्हायरल झाला आहे.








