दिल्लीनंतर आता सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आता मुंबईमधील वातावरण देखील गरम झालं आहे. शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीने आज आंदोलनाची हाक दिली आहे. शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीने आज आंदोलनाची हाक दिली आहे. त्यापार्श्वभूमिवर मैदानात कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. पण पोलिसांनी याठिकाणी मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यांनी शिवाजी पार्क परिसरात फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी सुरु केली. त्यामुळे शेकडो कार्यकर्त्याना अडवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी अमित ठाकरेंनाही पोलिसांनी अडवलं.
ठाकरे बंधू उतरले मैदानात
या आंदोलनात ठाकरे बंधूही उतरल्याचं पाहायला मिळत आहे.शिवाजी पार्कात पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु होती. यावेळी पोलिस शिवसेना भवन परिसरात गेले. तिथे कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये मोठा गोंधळ झालेला पाहयला मिळालाय. यावेळी सर्व परिस्थिती पाहता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे दाखल झाले. त्यांनी पोलिस व्हॅनवर चढत या पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदवला. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ तेजस ठाकरेही मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी मोर्चा सांभाळत पोलिसांच्या आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
अमित ठाकरे यांना अडवण्यात आलं
शिवसेना भवनात आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार वादावादी पाहायला मिळाली. शिवाजी पार्कात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना देखील अडवण्यात आले. त्यानंतर येथे दादर परिसरात पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली आहे. दादर शिवसेना भवनात पोलिस घुसल्याचे समजताच शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.
आंदोलकांची धरपकड करताना सेना भवन परिसरातही घुसले पोलीस
आंदोलकांची धरपकड करताना सेना भवन परिसरातही पोलिस घुसले. हे पाहून आता आदित्य ठाकरे देखील तिथं दाखल झाले आहेत. दरम्यान, आता याघडली मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सीजेपीचे कार्यकर्ते, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असे सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. त्यांनी सर्वांनी मिळून पोलिसांच्या कारवाईविरुद्ध घोषणाबाजी केली आहे.
मुंबईतही शिवाजी पार्कात आंदोलन सुरु
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली धुमसत असताना आता मुंबईतही शिवाजी पार्कात आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. शिवाजी पार्कात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना देखील अडवण्यात आल्याने ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे तसेच अनिल परब आदी पहिल्या फळीतील नेते मैदानात उतरले आहेत.
हे आंदोलन मोठे होणार: आदित्य ठाकरे
सर्व मुंबईकरांना आणि शिवसैनिकांना शिवाजी पार्कात येण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. अमित ठाकरे यांना सोडवण्यासाठी आम्ही शिवाजी पार्कात जात आहोत. आता हे आंदोलन मोठे होणार आहे. आम्ही आता थांबणार नाही असे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला आव्हान दिले आहे.त्यांच्या सोबत युवा नेते तेजस ठाकरे देखली सोबत असल्याचं पाहायला मिळत आहे.








