मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी म्हणजे आज (१० ऑक्टोबर २०२६) जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपीकडून आंदोलन केले जाणार आहे. सीजेपीच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला घेराव घालण्यात आला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्लीत येणाऱ्या 250 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. 45 मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. याचा फटका सीजेपीच्या आंदोलनाला होण्याची शक्यता आहे.
जंतर मंतरच्या चार किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद
शुक्रवार रात्री उशिरापासून रेल्वे आणि रस्त्याने दिल्लीत प्रवेश पूर्णपणे नियंत्रित करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणाला लागून असलेल्या दिल्लीच्या सर्व रस्त्यांच्या सीमांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. गुरुग्राम, फरिदाबाद, पानिपत, गाझियाबाद आणि नोएडा येथून दिल्लीत येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत जंतर मंतरच्या चार किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
दिल्लीत सर्वञ बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत
दरम्यान जंतर मंतरवर आंदोलनासाठी लोक येऊ लागले आहेत. दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. सरकार, प्रशासनाने आंदोलन हाताबाहेर जाऊ नये यासाठी सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. शुक्रवार रात्री उशिरापासून रेल्वे आणि रस्त्याने दिल्लीत प्रवेश पूर्णपणे नियंत्रित करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणाला लागून असलेल्या दिल्लीच्या सर्व रस्त्यांच्या सीमांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
‘रॅपिड ॲक्शन फोर्स’ च्या तुकड्या तैनात
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP ने नियोजित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर दिल्ली पोलीस आणि ‘रॅपिड ॲक्शन फोर्स’ च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षा कर्मचारी स्थानक परिसरात गस्त घालत आहेत आणि संपूर्ण परिसरावर ड्रोनद्वारेही लक्ष ठेवले जात आहे.
500 आंदोलकांना ताब्यात घेतलं
दिल्ली पोलिसांनी CJP ला जंतरमंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी दिली नाही. परिणामी, त्या ठिकाणी पोहोचलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीत पोलिसांनी आतापर्यंत 500 आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. तर 50 जाणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारा पार्श्वभूमी असलेल्या 50 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
महिला पोलिसांची पिंक ब्रिगेड, दिल्ली पोलिसांचे कमांडोही ठिकठिकाणी
तसेच दिल्लीत मंडी हाऊस मेट्रो स्टेशनबाहेर पाच किलोमिटर परिसरात इंटरनेट, फोन सेवा बंद करण्यात आल्या आहेत. सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. तर, जंरत मंतरवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.बुलेटप्रुफ जॅकेट घालून पोलीस आंदोलस्थळी दाखल झाले आहे, रस्त्यावर ड्रील करुन बॅरिकेड्स बसवले आहेत, महिला पोलिसांची पिंक ब्रिगेड, दिल्ली पोलिसांचे कमांडोही ठिकठिकाणी आहेत.
#WATCH | Delhi Police detain a few protesters who had started gathering at Jantar Mantar for the Cockroach Janta Party (CJP) protest here. https://t.co/QqZtF4Jswd
— ANI (@ANI) October 10, 2026
२५० गाड्या रद्द
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याची CJP कडे परवानगी नाही. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनापूर्वी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात CJP अपयशी ठरली. परिणामी, ४५ मेट्रो स्थानकांचे एन्ट्री आणि एक्झिट गेट्स बंद करण्यात आले आहेत आणि २५० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे सामान्य जनतेची मोठी गैरसोय झाली आहे
दिल्ली विमानतळावर पोहोचताच दिपके अन् सौरव दास यांना ताब्यात घेतलं जाणार?
दरम्यान अभिजीत दीपके थोड्याच वेळात दिल्लीत पोहोचणार आहेत. दीपके जंतर-मंतर येथे जाण्यावर ठाम आहेत. अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार आहे. दिल्ली विमानतळावर पोलिस बंदोबस्त वाढवला आहे.








