
भारतावर चक्रीवादळाचे मोठे संकट घोगांवत असून भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. देशातील अनेक राज्यांसाठी पुढील काही तास अत्यंत महत्वाचे असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे, एवढंच नाही तर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
‘अकवान’ चक्रीवादळाचा धोका
देशभरातील हवामानात बदल होत आहे.त्यातच ‘अकवान’ चक्रीवादळाचा धोका अनेक राज्यांना आहे. अकवान चक्रीवादळाची दिशा अचानक बदलली असून त्याचा प्रभाव अधिक दिसत आहे. अकवान चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टी भागाता धोका अधिक वाढला आहे.
उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये धुक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अकवान’ चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना पावसाचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय हवामान विभागाने IMD ने उद्या 20 नोव्हेंबर 2026 रोजी देशातील 14 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता
पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा आणि छत्तीसगड राज्यात पावसाचा मोठा इशारा जाहीर करण्यात आला. यादरम्यान अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ 130 च्या स्पीडने धडकणार आहे. त्यामुळे आता प्रशासनही अलर्ट मोडवर आलं आहे.चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोलकाता आणि दक्षिण बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपासूनच पाऊल सुरू झाला आहे.
शाळांना सुट्ट्या जाहिर
भारतीय हवामान विभागाने 20 नोव्हेंबर रोजी 14 राज्यात पावसाचा अलर्ट दिला आहे. अनेक राज्यात शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाडींना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या. चक्रीवादळ अधिक तीव्र होताना दिसत आहे. नुकसानीची मोठी शक्यता आहे.
सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट
तसेच अकवान चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन ओडिशा सरकारनं विशेष खबरदारी घेतली आहे. जवळपास ८० हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. तर ७४ बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. अकवान चक्रीवादळ आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘अकवान’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झारखंडमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने शुक्रवारी राज्यातील 11 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या चक्रीवादळाची दिशा बदलली आहे. त्यामुळे इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही याचा काय परिणाम जाणवणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.








