महिला वकिलावर अमानुष हल्ला: सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल!

बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा विदारक चेहरा समोर आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथे एका महिला वकिलावर गावातील सरपंच आणि त्याच्या समर्थकांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला आणि या महिलेवर काठ्या व जेसीबीच्या पाईपने बेदम हल्ला करण्यात आला. तिच्या शरीरावर गंभीर जखमा असून, अंग काळंनिळं पडल्याने ही घटना अधिक गंभीर बनली आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित महिला वकिलाने गावातील मंदिरावर लावण्यात आलेल्या लाऊड स्पीकरच्या आवाजामुळे त्रास होत असल्याचं सांगत तो बंद करण्याची विनंती सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे केली होती. तसेच घरासमोरील गिरणीचा आवाजही त्रासदायक ठरत असल्याने त्यांनी तो विषयही मांडला. मात्र सरपंचाने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, आणि नंतर तक्रार कर म्हणत तिला झटकून टाकलं.

त्यानंतर वकिल महिलेने पोलिसांकडे ध्वनीप्रदूषणाविरोधात तक्रार दाखल केली. यामुळे संतप्त झालेल्या सरपंचाने गावातील इतर 10 पुरुषांसोबत मिळून तिच्या घरी धाव घेतली. यावेळी तिच्या आई-वडिलांना माफी मागायला लावण्यात आली. पण त्यानंतर आरोपींनी थांबणं गरजेचं समजलं नाही.

शेतात नेत केला अमानुष हल्ला

त्यानंतर पीडित महिलेला जबरदस्तीने शेतात नेण्यात आलं आणि तिथे रिंगण करून तिच्यावर काठ्या आणि जेसीबी पाईपने अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ती बेशुद्ध झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, सद्यस्थितीत तिला चालणे आणि बोलणे सुद्धा कठीण झालं आहे.

गावकऱ्यांचा संताप

या घटनेमुळे संपूर्ण गावात आणि परिसरात संतापाची लाट उसळली आहे. महिलेला वकिल असतानाही असा अमानवी प्रकार सहन करावा लागला, हे धक्कादायक असल्याचं नागरिकांनी सांगितलं. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

पोलिसांचा तपास सुरू

या प्रकरणी संबंधित सरपंच संतोष देशमुख आणि इतर १० आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून तपास सुरू असून, पीडितेला न्याय मिळावा यासाठी प्रशासनावरही दबाव वाढतो आहे.

  • Related Posts

    “कराडचं एन्काऊंटर ठरणारच होतं? 10 कोटींची ऑफर आणि खळबळजनक खुलासा!

    बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडविरोधात एक नवा आणि गंभीर आरोप समोर आला आहे. यामध्ये थेट एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने दावा…

    संतोष देशमुख प्रकरणात नवे ट्विस्ट – महिला कटाचा आरोप, तिची हत्या

    बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी एका महिलेचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात संबंधित महिलेची आठ दिवसांपूर्वी…

    Leave a Reply

    You Missed

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    ‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

    संभाजी नगर वैजापूर येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    संभाजी नगर वैजापूर येथे  शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा आरोप: मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तक्रारीची दखल नाही

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    उदगीर: भरधाव ट्रॅव्हल्सची धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार

    सरन्यायाधीश भूषण गवई यांचा पहिला मोठा निर्णय: नारायण राणेंना झटका, पुण्यातील 30 एकर वनजमीन परत मिळणार