वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण

मुंबई: मुंबई शहराला वेगवान बनवण्यासाठी सरकार मेट्रो, कोस्टल रोड आणि सिमेंट रस्त्यांचे काम जलद गतीने करत आहे. पण या विकासाच्या झगमगाटात वर्सोवा जेट्टी परिसरातील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या समस्या मात्र दुर्लक्षित राहिल्या आहेत. मढ, भाट्टी, अक्सा, पटेलवाडी येथून अंधेरीच्या दिशेने येणाऱ्या लाखो प्रवाशांना दररोज अवैध पार्किंग, अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्यांचा मानसिक त्रास आणि आर्थिक खर्च वाढला आहे.

वर्सोवा गल्लीतून बोट धक्क्यापासून मुख्य रस्त्यापर्यंतचा अवघा 500 मीटरचा प्रवास कधी कधी 20-30 मिनिटांचा ठरतो. रस्त्यावर अवैध पार्किंग, दुकानांचे अतिक्रमण आणि विक्रेत्यांच्या गर्दीमुळे हा प्रवास डोकेदुखी ठरतो. मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी ऑटो रिक्षा हा एकमेव पर्याय असतो, पण येथे फक्त शेअर ऑटोच उपलब्ध होतात. प्रत्येक प्रवाशाला 25 रुपये मोजावे लागतात, जिथे मीटरनुसार भाडे 45 रुपये असते. एका तीन व्यक्तींच्या कुटुंबाला 75 रुपये खर्च येतो. परत घरी येताना वाहतूक कोंडीमुळे ऑटो मिळणेही दुरापास्त झाले आहे.

सात बंगला ते मच्छीमार बस स्टॉप रस्त्यावर हॉटेल्सच्या गाड्यांनी रस्ते व्यापले आहेत. फुटपाथ गायब झाले असून, नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही. अशा परिस्थितीत एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाचे वाहन पोहोचणार कसे? मनपा प्रशासनाने याची तपासणी करणे गरजेचे आहे.

वाहतूक प्रशासन आणि पोलिसांचा येथे अभाव जाणवतो. वाहतूक नियंत्रणाऐवजी केवळ सिग्नलवर कारवाई करण्यात प्रशासन व्यस्त आहे. स्थानिक प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी प्रशासन अन्य कामात गुंतले आहे. यामागे ‘मलिदा’ मिळत नसल्याचे कारण असावे, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.

या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याची गरज आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, अशी अपेक्षा आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर भविष्यात येथील परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे.

अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत रहा जागृत

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर कुणाचा अधिकार हा निकाल अद्याप प्रलंबित आहे.आज याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे.सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार…

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    भष्टाचार प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतोय. मग ती कोणती नोकरी असो किंवा कोणती परीक्षा. घोटाळेबाज सगळीकडेच असतात. पण नेहमी इतरांचे घोटाळे आणि गुन्हे उघडकीस आणणारेच घोटाळेबाज निघाले तर. होय, मुंबई पोलिस…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    शिवसेना कोणाची? धनुष्यबाण चिन्हाचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्ससह अनेक ब्रँड्स बॅन! दारूच्या नावावर ग्राहकांची फसवणूक? FSSAI ची मोठी कारवाई

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    आमीर खानसह सिनेमे गाजवले,नकारात्मक भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली;बॉलिवूडचा खलनायक हरपला, अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी गटांमध्ये तुफान राडा,दगडफेक अन् वाहनांची तोडफोड; ४५ जणांविरोधात कारवाई

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    मुंबई पोलिसांनी शासनाला लावला चक्क साडेसहा कोटींचा चुना; असा उघड झाला घोटाळा

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    महापालिकेचा निष्काळजीपणा जीवावर बेतला! भिवंडी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्याने घेतला बळी

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका

    भारतीय बॉक्सिंगची ऐतिहासिक सुवर्णरात्र! अवघ्या ९ तासांत जिंकली ७ सुवर्णपदके; भारताचा जगात डंका