जालना, नांदेड आणि धुळे अलर्टवर; ४ ऑगस्ट रोजी अचानक पुराचा इशारा

सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय. शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक धरणे फुल्ल भरले असून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शहरांना दिलासा मिळत आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचे हे हवामान महाराष्ट्रात कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यातच आता जालना, नांदेड आणि धुळ्यात मात्र पावसाने हाहाकार माजवला आहे. या शहरांमध्ये नदी प्रवाह सामान्यपेक्षा अनेक पट वाढण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जालना, नांदेड आणि धुळे जिल्ह्यांमध्ये अचानक पुराचा धोका

मंगळवार, ०४ ऑगस्ट, २०२६ रोजी जालना, नांदेड आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये अचानक पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार, या भागांमधील नद्यांचा प्रवाह सामान्य पातळीपेक्षा लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. जालना येथे नदीचा प्रवाह सामान्यपेक्षा ५.९ पट अधिक राहण्याचा अंदाज असून, ५ मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नांदेडमध्ये हा प्रवाह ५.० पट आणि धुळे येथे २.९ पट राहण्याची शक्यता आहे, तर अनुक्रमे ४ मिमी आणि ३ मिमी पावसाचा अंदाज आहे.

नदीकाठच्या आणि सखल भागात राहणाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन

या अलर्टमुळे, नागरिकांनी विशेषतः नदीकाठच्या आणि सखल भागात राहणाऱ्यांनी सतर्क राहावे. पाणी साचण्याची शक्यता असल्याने, अनावश्यक प्रवास टाळावा. नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो. सर्व नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे.

घरातून बाहेर पडताना किंवा प्रवास करताना सुरक्षिततेची खात्री करा

नदीकाठच्या सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अचानक पाणी वाढल्यास जलमय परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे घरातून बाहेर पडताना किंवा प्रवास करताना सुरक्षिततेची खात्री करा. कमी उंचीच्या किंवा पूरप्रवण भागात जाणे टाळावे.अस आवाहन करण्यात आलं आहे.

जालना धुळे सह या जिल्ह्यांनाही अलर्ट?

४ ऑगस्ट रोजी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, साताऱ्यासह घाटमाथ्यावरील भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणासह दक्षिण कोकण आणि गोवा येथे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याच्या सुचना

सध्याचे हे अलर्ट नदी प्रवाहाचे अंदाज आणि पर्जन्यवृष्टीच्या अंदाजित आकडेवारीवर आधारित आहेत. हवामानाच्या बदलत्या परिस्थितीनुसार यात बदल होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. त्यांच्या खात्यात लवकरच १,५०० चा हप्ता जमा होण्याची…

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

मुखदर्शन असो वा चरणस्पर्श, ‘नवसाला पावणारा’ म्हणून ख्याती असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक लालबाग-परळच्या गल्लीबोळात दाखल होत असतात. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक तासनतास, अगदी दिवस-दिवस…

Leave a Reply

You Missed

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

“मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा