
लोखंडवाला परिसरात राहणाऱ्या एका रहिवाशाची AXIS बँकेच्या नावाने सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. दिनांक 13 मे 2025 रोजी सकाळी 3:58 वाजता पीडित व्यक्तीला 7348096462 या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. कॉल करणाऱ्याने स्वत:ला AXIS बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून त्यांच्याकडून KYC (लयल्टी पॉइंट्स) अपडेटसाठी माहिती मागवली.
सदर व्यक्तीने सांगितलेल्या सूचनांनुसार, Cardsaxis.com या वेबसाइटवर लॉगिन करायला लावण्यात आले. त्यानंतर OTP मागवून खात्यातील रक्कम चुकवण्यात आली. यामध्ये पीडितांच्या AXIS बँकेच्या खात्यामधून ₹84,465 इतकी रक्कम डेबिट झाली.
घटनेनंतर पीडित व्यक्तीने तत्काळ AXIS बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून त्यांच्या क्रेडिट कार्ड संदर्भात माहिती दिली. यानंतर त्यांनी लोखंडवाला येथील AXIS बँकेच्या शाखेत जाऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे.
सदर फसवणूक AXIS बँकेच्या नावाने फेक वेबसाइट व बनावट कॉलद्वारे करण्यात आली आहे. संबंधित मोबाईल क्रमांक व वेबसाइट यांच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहितीही मिळत आहे.
त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही बँकेचा फोन आल्यास वैयक्तिक माहिती, OTP, कार्ड क्रमांक यासारखी माहिती शेअर करू नये. बँका कधीच अशा प्रकारे माहिती मागवत नाहीत. कोणतीही शंका असल्यास अधिकृत बँक शाखेशी किंवा हेल्पलाइनशी संपर्क साधावा.