मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

मंत्रालयात पुन्हा लाचखोरीचा स्फोट! ₹6.37 लाखांची लाच घेताना अधिकारी रंगेहात अटक, खारघरमध्ये एसीबीची कारवाई

मंत्रालयात पुन्हा एकदा लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, यावेळी अर्थ आणि नियोजन विभागातील अधिकारीच एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.

कक्ष अधिकारी विलास लाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई नवी मुंबईतील खारघर परिसरात करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी लाड याने संबंधित व्यक्तीकडे मोठ्या रकमेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने ९ मार्च २०२६ रोजी एसीबीच्या मुंबई कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल केली होती.

यानंतर १६ मार्च २०२६ रोजी एसीबीकडून करण्यात आलेल्या पडताळणीत संबंधित अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याचे आणि ती स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार ५ एप्रिल २०२६ रोजी एसीबीने खारघर, नवी मुंबई येथे सापळा रचला आणि विलास लाड याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा मंत्रालयातील भ्रष्टाचाराचा चेहरा समोर आला असून, सरकारी यंत्रणेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

अकोल्यात फर्निचरच्या कामाच्या बहाण्याने घरांमध्ये छुपे कॅमेरे; बेडरूम अन् बाथरूममधील महिलांचे खासगी क्षण रेकॉर्ड

प्रवास करताना हॉटेलमध्ये कुठे राहण्याची व्यवस्था करत असून तेव्हा नक्कीच आपण सगळेचजण आधी पाहतो ती सुरक्षा. कुठे छुपे कॅमेरे वैगरे नाही ना याची दक्षता घेऊनच आपण तिथे राहतो. पण हा…

वकील सुभाष पगारे यांचा मास्टरस्ट्रोक!ड्रग्ज केसचे फासेच पलटले; युक्तिवाद असा की मुख्य आरोपीला चक्क जामीन मंजूर

तब्बल ₹४० कोटींच्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ म्हणजे ड्रग्ज तस्करी आणि नेटवर्कशी संबंधित हाय-प्रोफाईल प्रकरणात मुख्य आरोपीला न्यायालयाकडून मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब खान याचा जामीन…

Leave a Reply

You Missed

नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

जिद्द, कष्ट आणि यश! पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचा डंका,पटेल वाडीतील गायत्रीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण

जिद्द, कष्ट आणि यश! पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचा डंका,पटेल वाडीतील गायत्रीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण

माणगावातील धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी

माणगावातील धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी

छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना

छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवक पदावर टांगती तलवार

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवक पदावर टांगती तलवार

मुंबईकरांच्या खिशाला कात्री; 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ, मुंबई, ठाणेसह कुठे होणार भाडेवाढ?

मुंबईकरांच्या खिशाला कात्री; 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ, मुंबई, ठाणेसह कुठे होणार भाडेवाढ?

मुंबईत मध्यरात्री भीषण दुर्घटना! कुर्ल्यात क्रेन कोसळून ८ ते १० जण जखमी, दोन घरांवर कोसळला ढिगारा

मुंबईत मध्यरात्री भीषण दुर्घटना! कुर्ल्यात क्रेन कोसळून ८ ते १० जण जखमी, दोन घरांवर कोसळला ढिगारा