जे. जे. महानगर रक्तपेढी आणि माया ब्लड सेंटर बंद; FDA तुकाराम मुंढेची मोठी कारवाई, गंभीर त्रुटी उघड

jj-mahanagar-blood-bank-maya-blood-centre-fda-action`

मुंबई : रक्तसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने जे. जे. महानगर रक्तपेढी आणि बदलापूर येथील माया ब्लड सेंटर यांच्यावर मोठी कारवाई करत दोन्ही रक्तपेढ्यांचे कामकाज पुढील आदेशापर्यंत तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार दोन्ही रक्तपेढ्यांना रक्तसंकलन, रक्तघटक निर्मिती, रक्ताची तपासणी, साठवणूक, वितरण, विक्री, रक्तदान शिबिरांचे आयोजन तसेच रक्तपेढीशी संबंधित सर्व प्रकारचे कामकाज तात्काळ बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या दोन्ही रक्तपेढ्यांबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची गंभीर दखल घेत FDA आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीत जे. जे. रक्तपेढीमध्ये रक्तसंकलन, साठवणूक, तपासणी, गुणवत्ता नियंत्रण आणि अभिलेख ठेवण्यासंदर्भातील नियमांच्या पालनात त्रुटी आढळल्याचे निदर्शनास आले.

औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम आणि संबंधित नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर FDA ने ही कारवाई केली आहे.

तर बदलापूर येथील माया ब्लड सेंटरमध्येही अनेक गंभीर अनियमितता समोर आल्या आहेत. रक्तदान शिबिरांमधून संकलित रक्ताच्या वाहतुकीसंदर्भातील आवश्यक नोंदी उपलब्ध नसणे, रक्तपिशव्यांच्या शोधक्षमतेतील त्रुटी, रक्तसंक्रमण अधिकारी आणि आवश्यक तांत्रिक कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, उपकरणांचे कालबाह्य प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण चाचण्यांचा अभाव, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनातील अनियमितता, तसेच रक्तदान शिबिरांसाठी आवश्यक मंजुरी आणि अभिलेखांचा अभाव आढळल्याचे सांगण्यात आले आहे.

रक्त ही जीवनरक्षक बाब असून त्याच्या संकलन, प्रक्रिया आणि वितरणामध्ये सर्वोच्च दर्जाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि पारदर्शकता राखणे अत्यावश्यक आहे. रक्तदाता आणि रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित निष्काळजीपणा किंवा नियमभंग सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

“रक्तपेढ्यांनी कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना सुरक्षित रक्त मिळण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,” असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

ही कारवाई राज्यातील इतर रक्तपेढ्यांसाठीही मोठा इशारा मानली जात आहे. रुग्णांच्या जीवाशी संबंधित असलेल्या रक्तसाठा आणि रक्तपुरवठा व्यवस्थेत नियमांचे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर बांगलादेशचा धक्का! पहिल्या डावात केलं चीतपट; पण सामन्याचा खरा हिरो ठरला तन्झिद हसन

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ अडचणीत आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला हा सामना जिंकायचा असेल, तर त्यांना जवळपास 16 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल.आधी संघाची फलंदाजी सपशेल अपयशी…

झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनापासून ढाब्यावरच्या त्या सोळा वर्षांच्या मुलापर्यंतचा प्रश्न…

खरकटी भांड्यांत हरवलेलं बालपण…. ज्या वयात त्याच्या हातात भविष्याची स्वप्नं, पुस्तकं आणि खेळण्याचं साहित्य असायला हवं होतं, त्या हातात जेवण झाल्यानंतर उरलेली खरकटी भांडी होती. एका हातात कापड होतं आणि…

Leave a Reply

You Missed

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंडुल आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! मुंडुल आणि माहीममधील फेमस चायनीज सेंटर्सवर FDAची धडक कारवाई, परवानाच रद्द

मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम

मुंबईकरांवरचे पाण्याचे संकट कायम! धरणांमध्ये समाधानकारक ९५% पाणीसाठा, पण पालिका पाणीकपातीवर ठाम

नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

नागपूरच्या गोधनीमध्ये मध्यरात्री भीषण क्लोरीन गॅस गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जणांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरू

अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

अमरावती रुग्णालय आग दुर्घटना: ३ बालकांच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे, दोषींवर कठोर कारवाईचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

समुद्राच्या पर्यावरणाला धोका! गोराई मनोरी प्रकल्पाविरोधात मच्छीमार संघटना एकवटल्या, मनोरी-गोराई जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध

जिद्द, कष्ट आणि यश! पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचा डंका,पटेल वाडीतील गायत्रीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण

जिद्द, कष्ट आणि यश! पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राचा डंका,पटेल वाडीतील गायत्रीने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले सुवर्ण

माणगावातील धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी

माणगावातील धक्कादायक घटना! सख्ख्या बापाकडून दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलीस कोठडी

छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना

छत्रपती संभाजीनगर हादरलं! आयफोनच्या हट्टापायी अख्खं कुटुंब संपलं, खवड्या डोंगरावर घडली दुर्दैवी घटना

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवक पदावर टांगती तलवार

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द, नगरसेवक पदावर टांगती तलवार