वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक वेसावा कोळीवाडा सध्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण कोळी समाज हादरून गेला असून प्रशासनाच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वेसावा कोळीवाड्यातील भूमिपुत्र राजू बाळकृष्ण काळथे यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. स्थानिकांच्या मते, महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या पंप जप्ती मोहिमेमुळे त्यांनी सकाळीच घरातील पंप काढून ठेवला होता. मात्र संध्याकाळी मर्यादित वेळेस येणाऱ्या पाण्याचा लाभ मिळावा म्हणून त्यांनी पुन्हा पंप जोडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वेसावा कोळीवाड्यातील अनेक घरे शेकडो वर्षे जुनी असून त्यामध्ये जमिनीखाली पाणीसाठवणुकीच्या आधुनिक टाक्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना छतावरील टाक्यांमध्ये पाणी चढवण्यासाठी मोटारींचा वापर करावा लागतो. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून मुंबई महानगरपालिकेकडून अशा मोटारी जप्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार, शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात अधिकारी घराघरांत जाऊन वैध जलजोडणी असलेल्या मोटारीदेखील जप्त करत आहेत.

या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे पाणीपुरवठा नियमित होत नाही, तर दुसरीकडे पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोटारी जप्त केल्या जात असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून या कारवाईविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, महानगरपालिका नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करू शकत नसेल तर लोकांनी आपल्या घरात पाणी कसे साठवायचे? पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी नागरिकांना मोटारींचा वापर करावा लागत असेल, तर त्यावर दडपशाहीची कारवाई का केली जात आहे? भूजलावरील पारंपरिक हातपंपांनाही बंदी घालून कारवाई केली जात असताना टँकर व्यवसायाला मात्र मोकळीक का दिली जात आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

मुंबईच्या विकासासाठी आपली जमीन, समुद्रकिनारे आणि पारंपरिक व्यवसाय गमावलेल्या कोळी समाजामध्ये या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “आम्ही पाणी मागितले होते, पण त्याची किंमत एका जीवाने का मोजावी लागली?” असा सवाल आता वेसावा कोळीवाड्यातून उपस्थित केला जात आहे.

राजू काळथे यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, वेसावा कोळीवाड्यात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा तसेच पंप जप्ती मोहिमेचा पुनर्विचार करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. तसेच के-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी आले यांच्यावर कारवाई करून त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

आता हा केवळ अपघात आहे की प्रशासनाच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम, याचे उत्तर शासन आणि प्रशासनाला द्यावे लागणार आहे. कारण एका भूमिपुत्राचा जीव गेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण वेसावा कोळीवाडा न्यायाच्या प्रतीक्षेत उभा आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    देशात सध्या ८०च्या दशकातील (1980s) ट्रेंड पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘80s AI Photo Trend’ तसेच त्या काळातील फॅशन आणि पॉप कल्चरशी संबंधित…

    झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनापासून ढाब्यावरच्या त्या सोळा वर्षांच्या मुलापर्यंतचा प्रश्न…

    खरकटी भांड्यांत हरवलेलं बालपण…. ज्या वयात त्याच्या हातात भविष्याची स्वप्नं, पुस्तकं आणि खेळण्याचं साहित्य असायला हवं होतं, त्या हातात जेवण झाल्यानंतर उरलेली खरकटी भांडी होती. एका हातात कापड होतं आणि…

    Leave a Reply

    You Missed

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    “आंघोळ न करताच जावं लागतं शाळेत…” कर्जतच्या व्हायरल व्हिडीओनंतर पेणच्या चिमुकल्यांचा’रिपोर्टर’ बनून ‘ग्राउंड रिपोर्ट’; मांडली पाणी टंचाईची समस्या

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    १६२-मालाड पश्चिमची ‘SIR’ मसुदा मतदार यादी जाहीर; मोबाईलवरून घरबसल्या यादी तपासता येणार अन् नावही दुरुस्त करता येणार, आमदार अस्लम शेख यांच्या पुढाकाराने ऑनलाईन पोर्टल

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    कांदा, लसूण, बटाट्यानंतर आता मेथीवरही बंदी! डब्यात मेथी आणली म्हणून विद्यार्थ्याला दंड; भाईंदरमधील शाळेचा धक्कादायक प्रकार, मनसे आक्रमक

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    “दरवाजा आतून लावून घ्या, मी…”, ‘ते’ शब्द ठरले शेवटचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकातील PSIचे ड्युटीवर असताना निधन

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबईतील १४ फुटांपेक्षा जास्त उंच झोपडपट्ट्या पाडणार? झोपडपट्ट्यांच्या पाडकाम कारवाईवर गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शिंदे अन् महानगरपालिका आयुक्तांना पत्र

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    मुंबई कोस्टल रोडवर थरार! भरधाव बीएमडब्ल्यू कार थेट पुलावरून खाली कोसळली; कारचा चक्काचूर, ३ तरुणांचा मृत्यू तर १ जण गंभीर

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ‘हायटेक’ फॉर्म्युला; आमदाराकडून तालुकाप्रमुखांना थेट १३ नव्या कोऱ्या बोलेरो कार

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    बापरे, लालबागच्या राजाच्या मुख दर्शनाची रांग १० किमीपेक्षाही लांब! रविवारी सुट्टीच्या दिवशी भाविकांची भयानक गर्दी, नियोजनाचं काय?

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण

    श्रीरामपूरच्या पावन भूमीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न; साहित्यिकांच्या उपस्थितीत ग्रंथाचे अनावरण