मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा Mumbai Metro Aqua Line 3

मुंबई : मुंबई मेट्रो अ‍ॅक्वा लाईन 3 मधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. भुयारी मेट्रोमधील नेटवर्क समस्येमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून त्रस्त असलेल्या प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला असून वोडाफोन आयडिया (Vi) कंपनीने आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या संपूर्ण मार्गावर आपली मोबाइल नेटवर्क सेवा सुरू केली आहे.

मुंबई मेट्रो लाईन 3 च्या जवळपास 50 मिनिटांच्या भुयारी प्रवासादरम्यान मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कार्यालयीन कामे, ऑनलाइन व्यवहार, व्हिडिओ कॉल, ई-मेल्स तसेच आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे कठीण होत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती.

गेल्या आठवड्यात Vi कंपनीने आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक या 16 स्थानकांवर मोबाइल सेवा सुरू केल्याची घोषणा केली होती. आता ही सेवा वाढवून संपूर्ण मार्गिकेवर म्हणजेच कफ परेडपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मात्र ही सेवा सुरू होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) आणि एसीईएस इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यातील काही तांत्रिक आणि आर्थिक वादांमुळे नेटवर्क सेवा काही काळ रखडली होती. भूमिगत स्थानके आणि बोगद्यांमध्ये नेटवर्क पोहोचवण्यासाठी एमएमआरसीने एसीईएस इंडिया या कंपनीला कंत्राट दिले होते. या कंपनीचे काम सर्व टेलिकॉम कंपन्यांसाठी इन-बिल्डिंग सोल्यूशन (IBS) नेटवर्क उभारणे होते.

मात्र नेटवर्क उभारणीनंतर एसीईएसने टेलिकॉम कंपन्यांकडे जागेचे भाडे आणि ‘राइट ऑफ वे’साठी जास्त शुल्काची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे अनेक टेलिकॉम कंपन्यांनी सेवा सुरू करण्यास नकार दिला आणि संपूर्ण प्रकल्प रखडला.

आता Vi नेटवर्क सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवासादरम्यान अखंड इंटरनेट, कॉलिंग आणि डिजिटल सेवा उपलब्ध होणार असल्याने वेळेची बचत होणार असून आपत्कालीन परिस्थितीतही संपर्क साधणे सोपे होणार आहे.

मुंबईच्या वेगवान जीवनशैलीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असताना मेट्रो प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

    भिवंडीच्या गंगारामवाडी भागातील कोहिनूर अपार्टमेंटच्या ‘ए’ विंगमध्ये नूतनीकरणाच्या कामादरम्यान झालेल्या भीषण अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. या अपघातात दहा जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले असून, तीन जण…

    ३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई, पुणे, नाशिकसह या जिल्ह्यांना रेट अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

    भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार,उद्या म्हणजेच ३ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट…

    Leave a Reply

    You Missed

    भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

    भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

    मोठी बातमी! इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग;पाच जणांचा मृत्यू ,तर ४१ जण बेपत्ता

    मोठी बातमी! इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग;पाच जणांचा मृत्यू ,तर ४१ जण बेपत्ता

    ३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई, पुणे, नाशिकसह या जिल्ह्यांना रेट अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

    ३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई, पुणे, नाशिकसह या जिल्ह्यांना रेट अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

    पहिल्याच पावसात फुटला फुगा! अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळा बांधकामात मोठा भ्रष्टाचार, धातूऐवजी सिमेंट; 30 लाखांच्या पुतळ्याचे पावसामुळे सत्य उघड

    पहिल्याच पावसात फुटला फुगा! अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळा बांधकामात मोठा भ्रष्टाचार, धातूऐवजी सिमेंट; 30 लाखांच्या पुतळ्याचे पावसामुळे सत्य उघड

    ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं

    ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, नव्या पिढीच्या संघर्षाची अन् सामाजिक परिवर्तनाची दिशा,सांस्कृतिक वारसा अन् नव्या पिढीची जबाबदारी

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, नव्या पिढीच्या संघर्षाची अन् सामाजिक परिवर्तनाची दिशा,सांस्कृतिक वारसा अन् नव्या पिढीची जबाबदारी

    मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली;शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांचा ताजा अहवाल काय सांगतो?

    मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली;शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांचा ताजा अहवाल काय सांगतो?

    काय ही शासनाची उदासीनता? पक्क्या रस्त्याअभावी गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ

    काय ही शासनाची उदासीनता? पक्क्या रस्त्याअभावी गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ

    नाशिकवर ढगफुटी आणि अतिवृष्टीचे संकट; प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी,एनडीआरएफ तैनात अन् शाळा-कॉलेजला सुट्टी

    नाशिकवर ढगफुटी आणि अतिवृष्टीचे संकट; प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी,एनडीआरएफ तैनात अन्  शाळा-कॉलेजला सुट्टी