मोठी बातमी! इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग;पाच जणांचा मृत्यू ,तर ४१ जण बेपत्ता

इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ एका प्रवासी जहाजाला आग लागल्याची मोठी घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. इंडोनेशियाच्या बचाव संस्थेनुसार आग लागली तेव्हा जहाजावर २७१ प्रवासी आणि कर्मचारी होते. रविवार दुपारपर्यंत किमान २२५ जणांना वाचवण्यात यश आलं आलं आहे. अद्याप बेपत्ता असलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बचाव कार्यासाठी अनेक जहाजे तैनात

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व जावा प्रांतातील सुराबाया येथून दक्षिण सुलावेसीमधील मकासारकडे जात असताना, जावाच्या ईशान्य किनाऱ्याजवळील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग लागली. बचाव कार्यासाठी अनेक जहाजे तैनात करण्यात आली आहेत. अधिकारी आजूबाजूच्या पाण्याच्या क्षेत्रात शोधमोहीम सुरु आहे.

अशीच एक घटना वर्षभरापूर्वी घडली होती

दरम्यान जहाजाला आगीचं कारण सध्या स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान अशीच एक घटना, एका वर्षापूर्वी इंडोनेशियामध्ये घडली होती. जुलै २०२५ मध्ये, उत्तर सुलावेसी प्रांताजवळ एका प्रवासी जहाजाला आग लागली होती, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला. सुमारे १५० लोकांना वाचवण्यात यश आलं होतं. केएम बार्सिलोना ५ नावाच्या या जहाजावर २८० लोक प्रवास करत होते. ही घटना १९ जुलै रोजी राजधानी मनाडो जवळ घडली होती.

इंडोनेशियामध्ये असे अपघात सर्रास घडतात

यापूर्वी २०२१ मध्ये, टर्नेटहून निघाल्यानंतर थोड्याच वेळात केएम कार्या इंदाह या जहाजाला मोलुक्का समुद्रात आग लागली. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना पाण्यात उडी मारण्यास भाग पडले. अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक मच्छीमार बोटींनी २२ मुलांसह १८१ प्रवासी आणि १४ कर्मचाऱ्यांची सुटका केली. १७,००० हून अधिक बेटांचा समावेश असलेल्या जगातील सर्वात मोठ्या द्वीपसमूह राष्ट्र, इंडोनेशियामध्ये असे अपघात वारंवार घडत असल्याचं समोर आलं आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर होणाऱ्या खर्चांवरून विरोधकांनी अनेकदा सरकारवर जोरदार टीकाही केल्याचं पाहायला मिळालं आहे. कारण सध्या चर्चा होतेय…

    गोवंश हत्या बंदी कायदा: सुप्रीम कोर्टाकडून तमिळनाडूत स्थगिती

    गोवंश हत्या बंदी कायदा: सुप्रीम कोर्टाकडून तमिळनाडूत स्थगिती नवी दिल्ली: देशातील कायदेशीर आणि राजकीय वर्तुळात अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या गोवंश हत्या बंदी कायदा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Who) एक अत्यंत महत्त्वपूर्ण…

    Leave a Reply

    You Missed

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

    गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार